Breaking News
Editor’s Choice
Relative News
Advertisement

Popular Blog
-
नंदगड संगोळी रायन्ना ‘वीर भूमी’ संग्रहालय प्रकल्पाची मंत्री, आमदारांकडून पाहणी…
Read More: नंदगड संगोळी रायन्ना ‘वीर भूमी’ संग्रहालय प्रकल्पाची मंत्री, आमदारांकडून पाहणी…यासंदर्भात जिल्हा पंचायत सभागृहात मंत्री, आमदारांच्या उपस्थितीत तयारीची बैठक पडली पार: अंतिम टप्यात असणाऱ्या या प्रकल्पाचे 19 जानेवारीला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते होणार उद्घघाटन…. …
-
खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा आणि गुलबर्गा सायन्स सेंटरद्वारे “सायन्स ऑन व्हील” विज्ञान प्रयोगाची कणकुंबीपासून सुरुवात कणकुंबी : लोकहित न्यूज
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व मनोभाव निर्माण होण्यासाठी तसेच विज्ञान प्रयोगांचा अनुभव मिळावा यासाठी शाळा कॉलेजमध्ये गोवा सायन्स सेंटर व गुलबर्गा सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा सायन्स ऑन व्हील्स हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यांचा उपयोग करून घेतला पाहिजे असे मत खानापूर तालुका क्षेत्र शिक्षणाधिकारी पी रामाप्पा यांनी व्यक्त केले.
पी रामाप्पा हे कणकुंबी येथील श्री माऊली विद्यालयाच्या सभागृहात गोवा सायन्स सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सायन्स ऑन व्हील्स या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना व्यक्त केले.गोवा सायन्स सेंटर व गुलबर्गा सायन्स सेंटरद्वारे खानापूर तालुक्यातील चौदा हायस्कूलमध्ये हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा उद्घाटन समारंभ कणकुंबी हायस्कूलमध्ये सोमवारी पार पडला.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी होते.
प्रारंभी मुख्याध्यापक एस जी चिगुळकर यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की ग्रामीण भागातील परिसरात विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग पाहण्याची व हाताळण्याची संधी मिळावी तसेच त्यासंबंधी तज्ञाकडून मार्गदर्शन मिळावे व विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने गोवा सायन्स सेंटरद्वारे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.त्यासाठी खानापूर तालुक्यातील चौदा शाळांनी दिड दोन महिन्यांपूर्वी ऑनलाईन नोंदणी केली होती.त्यानुसार गोवा सायन्स सेंटरचे उपक्रम समन्वय व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूर तालुक्यातील
चौदा हायस्कूलमध्ये सोमवारपासून सुरुवात झाली आहे.हा उपक्रम दि.३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. असे सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.उद्योजक बबन गावडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन झाले.
यावेळी बीईओ पी रामाप्पा व बीआरसी म्हणून रुजू झालेले एम.जी.हती यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शिक्षण संयोजक संतोष नाईक व शंकर कम्मार,गोल्याळी हायस्कूलचे मुख्या.के.एन.मन्नोळकर, साळुंखे,एस.डी.मुल्ला व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी गोवा सायन्स सेंटरचे भूषण राऊत यांनी मराठी मधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच गुलबर्गा सायन्स सेंटरचे अंबराया बेलमगी व लक्ष्मीकांत जमादार यांनी देखील माहिती सांगितली.यावेळी संतोष नाईक, विजय नंदिहळ्ळी, बबन गावडे यांनी शालेय स्तरावर विज्ञान किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.
हा उपक्रम खानापूर तालुक्यामध्ये एक महिना चालणार आहे.या ग्रुपमध्ये खानापूर तालुक्यातील चौदा माध्यमिक शाळांनी मोबाईल सायन्स सेंटर (MSC) साठी नोंदणी केली आहे.त्या चौदा शाळांना या उपक्रमाद्वारे सायन्स सेंटरची बस येणार असून ती प्रत्येक शाळेच्या आवारात दोन दिवस मुक्कामाला असेल. त्यात अनेक प्रयोगांची मांडणी केलेली असून त्यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी मराठी, कन्नड,हिंदी,इंग्लिश या सर्व भाषा अवगत असलेले तज्ञ आहेत.हा संपूर्ण उपक्रम मोफत असून बस सोबत येणाऱ्या मार्गदर्शकांची राहण्याची व्यवस्था संबंधित शाळेने करणे आवश्यक आहे.या उपक्रमांमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच परिसरातील जवळ असलेल्या माध्यमिक किंवा उच्च प्राथमिक (पाचवी ते सातवी) शाळेतील विद्यार्थ्यांना प्रयोग हाताळण्यासाठी संधी मिळत आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वतंत्र प्रयोगशाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध प्रयोगांपासून वंचित राहावे लागत असल्याने सदर उपक्रम उपयुक्त आहे.याचा लाभ चौदा शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. उपक्रमात सहभागी शाळांना पुढील काळात वेगवेगळ्या एनजीओकडून मिनी सायन सेंटर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून सदर शाळेतील उपक्रमशील विज्ञान शिक्षकांचे गोवा,महाराष्ट्र व कर्नाटक असे ‘इंटरस्टेट फोरम’ करून त्यासाठी विशेष प्रशिक्षण पणजी येथील गोवा सायन्स सेंटर येथे घेण्याचे नियोजित आहे.तरी खानापूर तालुक्यातील माध्यमिक शाळांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपक्रम समन्वयक पी.जी.काकतकर यांनी केले आहे.
सुत्रसंचलन एन.एस.करंबळकर यांनी केले तर विज्ञान शिक्षिका शामल भरणकर यांनी आभार मानले.Read More: खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गोवा आणि गुलबर्गा सायन्स सेंटरद्वारे “सायन्स ऑन व्हील” विज्ञान प्रयोगाची कणकुंबीपासून सुरुवात कणकुंबी : लोकहित न्यूज

सुत्रसंचलन एन.एस.करंबळकर यांनी केले तर विज्ञान शिक्षिका शामल भरणकर यांनी आभार मानले. -
जांबोटी विद्यालयाच्या वैभवात संगणक दालनाची भर. जांबोटकर प्रतिष्ठान चा उपक्रम.
जांबोटी : लोकहित न्यूज. येथील विश्व भारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयात संगणक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. किशोर गणपती जांबोटकर संस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने या संगणक दालनाची उभारणी करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे .
शैक्षणिक विकासाबरोबरच सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या जांबोटी विद्यालयाच्या विकासात या दालनाची भर पडली आहे. संगणक दालन सुरू करणारे तालुक्याच्या ग्रामीण भागातील हे प्रथम विद्यालय ठरले आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव परशुरामभाऊ नंदीहळळी हे होते.
विद्यार्थिनींच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर कै. किशोर जांबोटकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. साक्षी सुनीत जोशी (पुणे )यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले
प्रतिष्ठानचे सचिव श्री महेश विष्णू सडेकर यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले यावेळी व्यासपीठावर संचालक विनोद देसाई , नेरसा प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा देसाई. प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार सुनीत जोशी (पुणे) कु. स्वरा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी प्रतिष्ठानच्यावतीने बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याचा पारितोषिक वितरण समारंभ झाला गायन स्पर्धेत कु. त्रिवेणी गोवेकर, कु. दत्तराज सडेकर , कु. घनश्याम परमेकर ,अमृता सुतार यांना पारितोषिके देण्यात आली. भाषण स्पर्धेत कु. श्रीगणेश गुरव, नियती गव्हाळकर व राजवीर इंगळे यांनी पारितोषिके पटकावली तर निबंध स्पर्धेत कु. सानिका सुतार, श्रीगणेश गुरव व अनुष्का हळदणकर यांना पारितोषिके देण्यात आली.
सुनिता जोशी अनुराधा देसाई व विजयराव नंदीहळळी तर आज यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. विजयराव नंदीहळळी यांनी नाम फलकाच्या अनावरण केले व संगणक दालनाचे पूजन करून उद्घाटन केले. सहशिक्षक टी एन सडेकर यांनी सूत्रसंचालन केले व सौ सुजाता चलवेटकर यांनी आभार प्रदर्शन केले. महेश साबळे सुनिल ठानब संपदा तिरविर अर्जुन गावडे अदि उपस्थित होते .Read More: जांबोटी विद्यालयाच्या वैभवात संगणक दालनाची भर. जांबोटकर प्रतिष्ठान चा उपक्रम.
जांबोटी : लोकहित न्यूज. येथील विश्व भारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयात संगणक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. किशोर गणपती जांबोटकर संस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने या संगणक दालनाची उभारणी करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे .
शैक्षणिक विकासाबरोबरच सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या जांबोटी विद्यालयाच्या विकासात या दालनाची भर पडली आहे. संगणक दालन सुरू करणारे तालुक्याच्या ग्रामीण भागातील हे प्रथम विद्यालय ठरले आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव परशुरामभाऊ नंदीहळळी हे होते.
विद्यार्थिनींच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर कै. किशोर जांबोटकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. साक्षी सुनीत जोशी (पुणे )यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले
प्रतिष्ठानचे सचिव श्री महेश विष्णू सडेकर यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले यावेळी व्यासपीठावर संचालक विनोद देसाई , नेरसा प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा देसाई. प्रतिष्ठानचे मुख्य सल्लागार सुनीत जोशी (पुणे) कु. स्वरा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी प्रतिष्ठानच्यावतीने बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याचा पारितोषिक वितरण समारंभ झाला गायन स्पर्धेत कु. त्रिवेणी गोवेकर, कु. दत्तराज सडेकर , कु. घनश्याम परमेकर ,अमृता सुतार यांना पारितोषिके देण्यात आली. भाषण स्पर्धेत कु. श्रीगणेश गुरव, नियती गव्हाळकर व राजवीर इंगळे यांनी पारितोषिके पटकावली तर निबंध स्पर्धेत कु. सानिका सुतार, श्रीगणेश गुरव व अनुष्का हळदणकर यांना पारितोषिके देण्यात आली.
सुनिता जोशी अनुराधा देसाई व विजयराव नंदीहळळी तर आज यांची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. विजयराव नंदीहळळी यांनी नाम फलकाच्या अनावरण केले व संगणक दालनाचे पूजन करून उद्घाटन केले. सहशिक्षक टी एन सडेकर यांनी सूत्रसंचालन केले व सौ सुजाता चलवेटकर यांनी आभार प्रदर्शन केले. महेश साबळे सुनिल ठानब संपदा तिरविर अर्जुन गावडे अदि उपस्थित होते . -
जमीन भरपाई न दिल्याने;;बैलहोंगल कोर्टाकडून जिल्हा पंचायत सीईओंचे वाहन जप्त..
Read More: जमीन भरपाई न दिल्याने;;बैलहोंगल कोर्टाकडून जिल्हा पंचायत सीईओंचे वाहन जप्त..वाहन जप्ती होईपर्यंत हे अधिकारी काय करतात? ;एक कोटीपर्यंत भरपाई थकीत असल्याची शेतकऱ्याची माहिती.. बेळगांव ::लोकहित (विलास कवठणकर) बैलहोंगल तालुक्यातील कुलवळी ग्राम पंचायत हद्दीत…
-
माझ्या काळात तालुक्यातील एकही रस्ता विकासापासून राहणार नाही: आ. विठ्ठल हलगेकर…
Read More: माझ्या काळात तालुक्यातील एकही रस्ता विकासापासून राहणार नाही: आ. विठ्ठल हलगेकर…हब्बनहट्टी ( जांबोटी)तीर्थक्षेत्रावर रक्तदान शिबिराचे आयोजन; जांबोटी भाजप युवा कार्यकर्त्यांचे आमदारांकडून कोडकौतुक… विलास कवठणकर: हब्बनहट्टी लोकहित न्यूज तालुक्यात केंद्राकडून 80 कोटींच्या रस्त्यांचे काम…
-
तोपीनकट्टी ग्राम पंचायतीच्यावतीने तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल सोमांना हलगेकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ..
Read More: तोपीनकट्टी ग्राम पंचायतीच्यावतीने तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठल सोमांना हलगेकर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ..शुभेच्छुक – अध्यक्ष -उपाध्यक्ष सर्व सदस्य,पीडीओ व कर्मचारी . विकासाभिमुख ग्राम पंचायत तोपीनकट्टी ग्राम पंचायत…
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

You May Have Missed