July 21, 2026

कलाश्री बंबचा पाचवा लकी ड्रॉ पुढे ढकलला!

0
IMG_20260522_183330.jpg

संस्थापक- अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे हा निर्णय!

      

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

          बेळगांवसह महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा राज्यात कमी काळात लोकप्रिय ठरलेल्या कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरचा येत्या रविवारी ( 24) रोजी होणारा पाचवा लकी ड्रॉ कलाश्रीचे संस्थापक,अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या मातोश्रीं गंगुबाई लक्ष्मण डोळेकर यांच्या अचानक निधनामुळे पुढे ढकलण्यात आला आहे. मातोश्रींचे दिवसकार्य पूर्ण झाल्यानंतर पुढील तारीख जाहीर करण्यात येईल, अचानक तारीख बदलामुळे झालेल्या नागरिकांच्या गैरसोयीबद्दल कलाश्रीकडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. तरी अधिक माहितीसाठी 9448055608/ 9480017217 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *