July 21, 2026

शहीद धोंडिबा देसाई यांच्या कार्याची गौरवगाथा; रविवारी वडगावात (जांबोटी) पुतळा अनावरण!

0
IMG_20260522_062855.jpg

1999 च्या कारगील युद्धात देशासाठी प्राण पणाला लावले; उभारलेल्या कमानीवर पुतळ्याची शोभा!

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         देशाच्या इतिहासातले महत्वाचे युद्ध म्हणून ओळखल्या 1999 च्या कारगील युद्धात देशासाठी प्राण पणाला लावलेल्या वडगांव (जांबोटी) येथील शहीद जवान धोंडिबा देसाई यांच्या कार्याची गौरवगाथा (रविवार दि.24) लिहिली जाणार आहे. याआधी गावच्या वेशीवर देसाई यांच्या नावे कमान उभारण्यात आली असून, त्याठिकाणी रविवारी अनगोळ ( बेळगांव) येथून मिरवणूक काढत पुतळा आणण्यात येणार आहे. त्याचे सदर कमानीवर अनावरण करण्यात येईल, अशी माहिती जांबोटी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

कारगील युद्धातील कर्नाटकातील तिसरा शाहिद जवान…

     वीर शहीद जवान धोंडिबा देसाई हे कर्नाटक राज्यातच 25 मेच्या कारगील युध्दात तिसरे शहीद जवान ठरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातूनच त्यांचा गौरव केला जात आहे. त्यात गावकऱ्यांचा अभिमान तर डोंगराएवढा वाढला असून, त्यांच्या त्या शौरगाथेला उजाळा देण्यासाठी आधी गावच्या वेशीवर देसाई यांच्या नावे गावकऱ्यांनी कमान बांधली आणि त्यावर शहीद जवान धोंडिबा देसाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे, तरी जांबोटीसह भागातील नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन वडगांव गावकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे.

कुठे आणि किती वाजता कार्यक्रम…

     रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरवात होईल, सर्वांनी अनगोळ येथे जमायचे आहे, त्यानंतर अनगोळ येथून कोणये मार्गे जांबोटीतून वडगांवला सदर पुतळा आणण्यात येणार आहे. ..

     

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *