आठवडाभरात दोनदा पेट्रोल -डिझेल भडकले; 3.90 पैशांनी पेट्रोलची वाढ!


आणखी महागाईचा भडका उडणार; मुंबईत पेट्रोल 107 तर डिझेल 94 रुपये पार..

  

   

नवी दिल्ली/ मुंबई लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)

            इराण इजरायल युद्धामुळे आणखी कोण कोणत्या अडचणींना सामान्यांना करावा लागणार हे भारत सरकारलाच ठाऊक म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, आठवडाभरात दोनदा पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने, सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. चार दिवसांपूर्वी 3 रुपयांनी तर (आज 19) पासुन आणखी 90 पेट्रोलची पैशांनी वाढ होणार आहे. म्हणजेच आठवडाभरातच 3 रुपये 90 पैशांनी दरवाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने देशातील पेट्रोल, डिझेल दरवाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पाच राज्यांतील निवडणुका संपताच तेल दरवाढीने उचली खाल्ली…

        पेट्रोल डिझेल दरवाढ होणार हे दोन महिन्याआधी निश्चित होते, मात्र, देशातील पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे ही वाढ झाली नव्हती. निवडणुका संपताच तेल दरवाढीसह इतर बाबतीतही महागाईमध्ये वाढीचे सत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी 3 रुपये तर आजपासून 90 पैसे टेल दरवाढ झाले आहे.

भाजीपाला , दूध इतर जीवनावश्यक वस्तूही महागणार!

        तेलाबरोबर येत्या काहीं दिवसांत जीवनावश्यक वस्तूही महागणार आहेत. परिणामी याचा थेट सामान्यांना फटका बसणार आहे. त्यात स्थानिक कर आणि व्हॅट (vat) फरकाचा महाराष्ट्रात अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य आणि शहरात वाढीव दर….

     कर्नाटकात 106.76 पैसे, महाराष्ट्रात 107.77 पैशे, केरळ 109.74 पैसे, मध्यप्रदेशात सर्वाधिक 111.11 पैशे सध्या दर सुरू आहे, मुंबईत 107.59 पैशे त्यात आता 90 पैशांची अधिक वाढ सर्वत्र होणार आहे, दिल्लीत 98.64, चेन्नईत 104.49, कोलकत्ता 109.70 पेट्रोलची वाढ झाली आहे. तर डिझेल मुंबई 94.8 (+ 94 पैशे नवीन वाढ), दिल्लीत 91.58 पैशे+ 91 पैशे, कोलकत्ता 96.7 + 94 पैशे , चेन्नई 96.11 + 86 पैशे अधिक वाढ झाली आहे.

  


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *