दिव्या देसाईने राज्यात तालुक्याचे नाव उज्वल केले: आ. विठ्ठल हलगेकर!


इंग्रजी विषयाच्या फेरतपासणीत दिव्या देसाईला 124 ऐवजी 125 गुण मिळाले; 625 पैकी 625 गुण मिळवून राज्यात अव्वल!

   

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     जिद्द, चिकाटी आणि स्वतःवर दृढ विश्वास असेल तर जगातील कोणतेही उद्दिष्ठ पार करता येते, याचे जिवंत उदाहरण झुंझवाडच्या ( ता.खानापूर) जिद्दी आणि हुशार विद्यार्थिनी दिव्या देसाईने सिद्ध करून दाखवले आहे. मुळात मराठमोळ्या कुटुंबातील आणि होली क्रॉस या बिडी स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या दिव्याने पैकीच्या पैकी गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्या उतुंग यशाबद्दल खानापूर तालुक्यासह जिल्हा आणि राज्यातून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरू आहे. शनिवारी तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बोलतांना दिव्या देसाईने तालुक्याचे नाव राज्यात उज्वल केल्याचे मत व्यक्त केले.

       शिक्षणखाते आणि खानापूर तालुका प्रशासनाच्यावतीने काल दिव्या देसाईचा विशेष सत्कार करण्यात आला. व्यावेळी आमदार हलगेकर बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिक्षण हीच सध्याच्या मानवी जीवनातील खरी ताकद असून, त्यावर विशेष सर्वांनी ध्यान दिले पाहिजेत, तरच प्रत्येकजण पुढे जाऊ शकतो. नाही तर आजच्या जमान्यात जगणे मोठे कठीण बनू शकते असेही ते म्हणाले. यावेळी बीईओ रामाप्पा, शिक्षण खात्याचे अधिकारी कमार, अँड.चेतन मेरीकर यांच्यासह तालुक्यातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.

फेरतपासणीत मिळाला राज्य प्रथम क्रमांक!

       दृढ विश्वासाने लिखाण अर्थात प्रत्येक प्रश्नांची करेक्ट उत्तरे दिल्याच्या आत्मविश्वास असलेल्या दिव्याने इंग्रजी पेपरची फेरतपासणीची मागणी परीक्षा शिक्षण बोर्डकडे केली होती. त्याची दखल घेत, बोर्डाने पुन्हा तपासणी केली असता, इंग्रजी विषयात आधी पडलेल्या 124 गुणांच्या ठिकाणी 125 म्हणजे पैकीच्या पैकी मार्कस मिळाले. त्यामुळे त्या एक मार्कसच्या जोरावर ती राज्यात प्रथम आली आहे. त्या एक कमी गुणामुळे तिला आधी द्वितीय क्रमांक म्हणून घोषित केलेल्या शिक्षण खात्याला  फेरतपासणीनंतर पुन्हा प्रथम क्रमांक म्हणून घोषित करावे लागले. दिव्या देसाईने इतर पाच विषयात पैकीच्या पैकी मार्कस घेतले असून, इंग्रजीत तिला 125 मार्कसऐवजी 124 अर्थात एक मार्कस कमी मिळाला होता. अखेर तिच्या दृढ विश्वासावर तिने राज्यातच प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली आहे…  लोकहित न्यूज तर्फे तिचे खूप खूप अभिनंदन!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *