
नुकसाग्रस्तांच्या प्रतिक्रिया ; देवराई, जांबेगाळीतील नुकसानग्रस्तांना इरफान ताळीकोटी यांची प्रत्येकी 10 हजाराची मदत पोहचली!
देवराई/ खानापूर: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर )
तालुक्यात एकच सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झालेल्या खानापूर अंजुमन इस्लामचे अध्यक्ष व माजी तालुका युथ काँग्रेसचे अध्यक्ष इरफान ताळीकोटी यांनी आमचे दुःख समजून घेऊन पुसले आहे, त्याबद्दल त्यांचे आम्हीं आभारी आहोत, आता आम्हाला सरकारी मदतीची अपेक्षा असल्याच्या प्रतिक्रिया देवराई, जांबेगाळीतील इरफान ताळीकोटी यांच्याकडून मदत मिळालेल्या नागरिकांतून व्यक्त होत आहेत. कालच ताळीकोटी यांनी मदर जाहीर केलेल्या त्या 6 (घरे) नुकसानग्रस्त नागरिकांना 10 हजाराची मदत अदा केली. यावेळी एमडी शरीफ इनामदार, इकबाल इनामदार, नवीन झुंजवाडकर, महाऋती डंबलकर, चंद्रकांत देसाई, रामू चौरी, बसपा तेरिमिलकर, कैफ इनामदार, ज्ञानेश्वर गुरव, सीताराम देसाई, जोतिबा तांडे, रामलिंग नरकड, नागो नारायण बाऊलकर, पांडुरंग मेंडिलकर, हबीब इनामदार, झहीर इनामदार, झुबेर इनामदार, अलीसाब इनामदार, इब्राहम , सदानंद तांडे, महादू वीर, फोंडप्पा मांडवडकर, यल्लारी सुतार, मारुती केसरेकर, संतोष तिरमिडकर, तय्यब मुल्ला, रफीक पटेल, पुंडलिक दळवी आदी उपस्थित होते.






Leave a Reply