थेट अयोध्येतून – राम मंदिराची उभारणी खूप सुंदर; पण, मंदिर चोरीबाबत स्थानिक नागरिक म्हणतात, प्रकरणाचा रस्ता दिल्लीपर्यंत पोहचतो…
लोकहित न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट; चौकशी सुरू पण, अद्याप पूर्ण प्रकरणाचा छडा नाही; पथक म्हणते ‘जांच चल रही है’!
लोकहित न्यूज उत्तरप्रदेश दौरा भाग – 1
अयोध्या: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
देशाचेच नव्हें तर जगाचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच भाजप पक्षाला सत्ता मिळण्यास महत्त्वांच्या मुद्दा ठरलेल्या अयोध्येतील श्री राम मंदिराची उभारणी कलाकृती खूप सुंदररीत्या उभारण्यात आली आहे, दररोज या ठिकाणी लाखो भाविक ये- जा करताहेत ! पण, जून महिन्यामध्ये झालेल्या चोरीबद्दल स्थानिक म्हणतात, या प्रकरणाचा रस्ता दिल्लीपर्यंत पोहचतो! नागरीकांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, एवढी मोठी चोरी सत्ताधारी राजकीय हस्तक्षेपाशिवाय शक्यच नाही असाच होतो. लोकहित न्यूज च्या पाहणीनुसार पावलापावलावर कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, असे असताना, दोनशे कोटींपर्यंत चोरी होतेच कशी? हा मोठा चिंतनाचा विषय आहे. उत्तरप्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीने माहिती घेतली असून, 150 वेळा चोरीचा प्रयत्न झाल्याचा येथील सीसीटीव्हीच्या पाहणीतून दिसून आले. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.
त्यानंतर सुरक्षा यंत्रणा कडक; पण, काय करणार आता गेली निघून!
मंगळवारी रात्री लोकहित न्यूज च्या प्रतिनिधींनी श्री राम मंदिरमध्ये प्रवेश करत संपूर्ण माहिती घेतली, त्यावेळी प्रत्येक गेटवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, मोबाईल तर सोडाच साधे पेनही काउंटमध्ये जमा करून घेण्यात येते. इतकी ही कडक सुरक्षा! प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पोलिसच पोलिस दिसतील! मंदिरातील चोरी प्रकरणानंतर सुरक्षा अधिकच कडक ठेवण्यात आली आहे, पण, आता वेळ जाऊन काय उपयोग?
काय म्हणतात स्थानिक नागरिक..
ये चोरी जो हैं ना! एसमे बहुत बडे लोगोंका हात है! तबी अभितक कुछ भी नहीं हो पाया है! भगवान को भी नहीं छोडा, कैसे लोग हैं यार!
-मोहनलाल यादव, अयोध्या.
इस चोरीका तो, कुछ नहीं हो पायेगा! ये तो दबादी गयी हैं! ऐकके बारीमे आपको क्या केहना, भाई! ये तो भगवानही जाणें! राधे राधे!
- स्थानिक नागरिक, (नाव न सांगण्याच्या अटीवर प्रतिक्रिया)
याच राम मंदिराचा निकाल लागण्यास भारतीय न्यायालयात वर्षानुवर्षे लोटली तर या चोरीचे आणि काय होणार, तसेच! राजकीय हस्तक्षेप आहे की, नाही याबद्दल मला माहित नाही! पण, चोरी करणारे भोगणार एवढे मात्र, नकीच!
–अतुल पांडे, प्रतापगड (अयोध्या)


