October 20, 2026

कर्नाटकात राजकीय खळबळ! पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांच्यावर ‘ईडीची’ धाड!

0

सतीश जार्कीहोळी यांच्या कर्नाटक- महाराष्ट्र राज्यातील नातेवाईक ठिकाणांवर छापे!      बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)…


Screenshot_20260909_114423

सतीश जार्कीहोळी यांच्या कर्नाटक- महाराष्ट्र राज्यातील नातेवाईक ठिकाणांवर छापे!

    

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

    अबकारी खात्याचे अधिकारी मंजुनाथ यांच्यावर मागच्यावेळी धाड पडली होती, ते पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांचे नातेवाईक असल्याने आज सकाळी त्यांच्यावरही धाड टाकण्यात आली आहे. बेळगाव, बंगळूरसह महाराष्ट्रासह 15  निवासस्थानांवर ईडीने छापे टाकले आहेत, मंजुनाथ यांचा मागच्या तपासादरम्यान काहीं धागेदोरे ईडीच्या हाती लागले असावे, त्यामुळेच आजची धाड पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्यावर कोणते आरोप आहेत…

    बेकायदेशीर बार परवाने मंजूर करणे, विनाहिशेब गुंतवणूक, मनीलाँड्रिंग सारखे तात्कालीन अबकारी डीसी असलेल्या मंजुनाथ यांच्यावर आहेत, त्यामध्ये पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांचाही समावेश आहे का? असाच संशय ईडीला असावा म्हणूनच त्यांनी याच अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…

       सतीश जार्कीहोळी हे कर्नाटक राज्यातील महत्वाचे व्यक्तिमत्व तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. सध्या राज्यात काँग्रेसचे सरकारी असून, त्या सरकारमध्ये ते बेळगावचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आजच्या ईडीच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, तपासात काय सापडणार का? हे सायंकाळपर्यंत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *