October 20, 2026

जांबोटीत आज! जांबोटी मल्टिपर्पज सोसायटीच्या 34 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन!

0

तालुक्यातील जुनी अन् अग्रगण्य संस्था (सोसायटी) ; 2024- 25 प्रेसिडिंग वाचून दाखवणे, 2025- 26 चा…


Screenshot_20260910_052540

तालुक्यातील सर्वात जुनी अन् अग्रगण्य संस्था (सोसायटी) ; 2024- 25 प्रेसिडिंग वाचून दाखवणे, 2025- 26 चा नफा -तोटा तसेच ताळेबंद यावर चर्चा विचारविनिमय करून त्यावर मिळेल मंजूरी…

जांबोटी: लोकहित न्यूज! (विलास कवठणकर)

    खानापूर तालुक्यातच नंबर एक तसेच सर्वात आधीची सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी  मल्टीपर्पज सोसायटीची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (गुरुवार दि.10 सप्टेंबर) रोजी सकाळी 11.30 वाजता जांबोटी रामापूर पेठेतील श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आली असून, सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन सोसायटीचे संस्थापक- अध्यक्ष विलास बेळगावकर यांनी केले आहे.

   

सभेतील विषय

   1) 2024- 25 ला पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील प्रोसिडींग वाचून दाखवणे.

2) दि. कर्नाटक कायदा 1959 (कलम 27) नुसार खालील विषय सूचीवर चर्चा करणे.

3) (1) 2025- 26 सालचा संचालक मंडळाने प्रसिद्ध केलेला नफा तोटा, ताळेबंद वाचून त्याला मंजुरी देणे . यानुसार अशा एकूण 12 महत्वाचा विषयांवर यावेळी चर्चा, विचारविनिमय करून त्याला मंजुरी दिली जाईल, त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय घेण्यात येतील अशी माहिती सोसायटीचे व्यवस्थापक दिलीप हन्नुरकर यांनी अहवालानुसार प्रसिद्ध केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *