कुसमळी डॅम, खानापूर मासळी मार्केट रस्ता, तालुक्यातील उच्चांकी भ्रष्टाचार, तसेच तालुक्यातील कामांचा ‘श्रेयवाद’ हे मुद्दे केंद्रस्थानी असतील!
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांची आज (गुरुवार दि.10) खानापूर सार्व. बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, यावेळी तालुक्यातील कळीचे मुद्दे मा. आमदार डॉ. निंबाळकर यांच्याकडून उपस्थित केले जाणार आहेत. तरी सर्व पत्रकारांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन, प्रभावी तालुका काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी कळविले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत तालुक्यातील वादग्रस्त ‘मुद्दे ‘ केंद्रस्थानी….
कुसमळी डॅम, खानापूर मासळी मार्केट रस्ता ,तालुक्यातील अधिकाऱ्यांचा उच्चांकी भ्रष्टाचार, तालुक्यातील विकासकामात श्रेयवाद कुणाचा? , सामान्य जनतेला उत्तम योजना देत शंभर दिवस पूर्ण करत असलेल्या राज्यातील काँग्रेस सरकारविरोधात नेहमीच तालुक्यातील भाजपमंडळी पुढे असते तर मग, संपूर्ण जगातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील भगवान श्री राम मंदिरातील चोरीबद्दल कोणताच तपास किंवा त्याविषयी काय झाले? याचा अद्याप थांगपत्ताच नाही! यावर हीच भाजपमंडळी चिडीचूप का? या विषयावरही माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी बोट ठेवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद गाजणार असून , संपूर्ण तालुक्याचे लक्ष याकडे लागून आहे.
