October 20, 2026

नंदगड आरोग्य केंद्राच्या ‘बारा भांदगडी’ ; आमदारांनी ‘भरला’ अधिकाऱ्यांना ‘दस का दम’!

0

रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची आमदारांकडून दखल; प्रजासेवा कार्यक्रमात नागरिकांनी मांडल्या समस्याच समस्या……


IMG_20260913_143320

रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची आमदारांकडून दखल; प्रजासेवा कार्यक्रमात नागरिकांनी मांडल्या समस्याच समस्या…

नंदगड : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      खानापूरनंतर महत्वाचे शहर म्हणून नंदगडची ओळख आहे. मात्र, अलीकडे येथील समस्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराबद्दल नागरिकांनी वारंवार तक्रार, पूर्वकल्पना देऊनही संबंधित अधिकारी डॉक्टरांनी कानाडोळा केला होता. त्याविरोधात नागरिकांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे तक्रार केली, त्याची दखल घेत आमदारांनी परवाच पार पडलेल्या प्रजासेवा कार्यक्रमावेळी अचानक आरोग्य केंद्राला भेट देऊन डॉक्टरांची झाडाझडती घेतली.

       यावेळी नागरिकांच्या सर्व समस्यांची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली, यावेळी योग्य उत्तरे देण्यास असमर्थ ठरलेल्या डॉक्टरांना आमदारांनी चांगलाच’ दम’ भरला. यावर आरोग्य अधिकारीही अवाक् झाले. यापुढे आरोग्य सुविधांबद्दल कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा आमदारांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश कऱ्याप्पानावर यांना दिला.

प्रजासेवा कार्यक्रमात नागरिकांनी मांडल्या समस्याच समस्या…

   नंदगड येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासेवा कार्यक्रमात नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या. त्यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी कारणे विचारताच त्यावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली . त्यावर संतप्त झालेल्या आमदारांनी तात्काळ नागरिकांच्या समस्या न सुटल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा दिला. यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी रमेश मेत्री यांच्यासह तालुक्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते..

      


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *