लोकहित न्यूज चा दणका; तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सुरू केला तपास…
खानापूर::लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
चार दिवसांपूर्वी लोकहित न्यूज ने मोदेकोप -कान्सुली भागासह तालुक्यात बोगस डॉक्टरांचे काळे कारणाने अशी बातमी प्रसिद्ध केली होती, त्याची दखल आरोग्य अधिकारी डॉ महेश के. यांनी जांबोटीसह खानापुरातील बोगस डॉक्टरांचा वाढते प्रमाण सामान्य जनतेला नाहक त्रास होत असून, जीवाला धोका निर्माण झाला आहे. राज्य सरकारने अशा डॉक्टरांची शोध मोहीम सुरू केली आहे, त्याला लोकहित न्यूज चे बळ मिळाले अन् अशा डॉक्टरांची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे.
बेळगुंदी भागातील डॉक्टरांचाही शोधशोध सुरू होणार….
बेळगावातही बोगस डॉक्टरांनी हैदोस माजविला असून, त्यांचाही शोध घेण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. बेळगुंदी, राकसकोप, यळेबैल, सोनाली भागातही वावरत असलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेश के यांनी लोकहित न्यूज ला दिली…