लैला शुगर्सचे एमडी व जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष सदानंद पाटील यांचे जांबोटीत प्रतिपादन; जांबोटीत इमारत बांधकाम कार्यालयाचे उद्घघाटन अनेक मान्यवर अधिकाऱ्यांची उपस्थिती!

जांबोटी:लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आजच्या समाजातील खरे शिल्पकार कोण असतील तर बांधकाम, प्लंबिंग, शेंट्रिंग, इलेक्ट्रिकलसह इतर बांधकाम कामगारवर्ग आहे. त्यांच्यामुळेच आम्ही घर आंगणसह बांधकाम क्षेत्रातील गरजा पूर्ण करू शकतो. पण, सध्याच्या घडीला त्यांच्या जीवाचा प्रश्न कायम निर्माण होत असतो, केव्हा कोणती समस्या उद्भवेल याचा नेम नसतो. त्यासाठी सरकारने कामगार खात्याची निर्मिती केली असून, त्यांच्या माध्यमातून विविध योजना, आरोग्य सेवा उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी एकत्र येऊन राज्यभर संघटना, संघ स्थापन केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील लाभार्थी कामगारांनी एकत्र यायला हवे, तालुक्यात बिडी इमारत बांधकाम व इतर बांधकाम संघाच्या माध्यमातून तालुक्यातील काजगारांचे हित साधण्यात येत आहे,
आज जांबोटीत बिडी संघाचे शाखा कार्यालय स्थापन झाल्यामुळे भागातील कामगारांना शासकीय योजना आणि आरोग्य कवच प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष तसेच लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांनी व्यक्त केले. जांबोटीत इमारत बांधकाम व इतर बांधकाम बिडी कामगार संघाचे कार्यालय स्थापन केल्यामुळे स्थानिक कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही ते पुढे बोलतांना म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल बैलुरकर होते, संघाचे अध्यक्ष शिवा बागवाडकर यांनी स्वागत केले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, यावेळी राजेश जाधव कामगार जिल्हाअधिकारी, मल्लिकार्जुन जोगुर जिल्हा कामगार अधिकारी, भाजप नेते मारुती पाटील, जांबोटी ग्राम पंचायत माजी उपाध्यक्ष सुनील देसाई, माजी आमटे ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव, सिद्धेश्वर कॉन्ट्रॅक्शनचे अध्यक्ष अनिल कालमनकर , प्रगतिशील शेतकरी मारुती कोलीकर, माजी आमटे ग्राम पंचायत सदस्य नागोजी पाटील, लोकहित न्यूज चे संपादक विलास कवठणकर आदी मान्यवर उपस्थित होते. बिडी कामगार संघाचे संचालक कृष्णा भरणकर यांनी स्वागत केले. यावेळी बिडी संघाचे अध्यक्ष शिवा बागवाडकर यांनी कामगार खात्याच्या योजना, आरोग्य विमा आणि संघाच्या कार्याबद्दल माहिती देऊन आभार मानले. यावेळी खानापूर, बिडी कार्यालयाचे कामगार उपस्थित होते.