ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या आग्रहानंतर वनखात्याकडून पाहणी; वन्यप्राणी आणि शेतकरी संघर्ष रोखण्याची गरज…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
ऐन पिके भरात येत असतांनाच जांबोटी जिल्हा पंचायत विभागातील निलावडे परिसरात दोन हत्तींनी मोठा उच्छाद मांडला असून, शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल होवून बसले असून. येथील सर्वे नंबर- 42 मधील सुमारे दीडशे टन उसाचे नुकसान हत्तींकडून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास चार -पाच एककरमधील उसाची नासधूस हत्तींनी केली आहे. याची माहिती मिळताच तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी वनखात्याला जाब विचारत नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी करण्यास वनखात्याला भाग पाडले. आणि त्यानंतर रेंजर श्रीकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्या हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करून,नुकसानीइतकी भरपाई मिळाली पाहिजेत अशी,जोरदार मागणी विनायक मुतगेकर यांनी अधिकाऱ्यांसमोर लावून धरली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य महादेव कवळेकर, रमेश नाईक यांनी यावेळी उपस्थित होते.
त्यावर रेंजर श्रीकांत पाटील यांनी माझ्या सर्विसमध्ये इतकी मोठी नुकसान पाहिली नसून, खरोखरच नुकसानीप्रमाणे भरपाई मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे यावेळी सुचित केले. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रे द्यावीत सरकारदरबारी सर्वोतोपरी प्रयत्न करू असेही पाटील यांनी पुढे बोलतांना स्पष्ट करण्यात.
विनायक मुतगेकर यांची डीएफओ, एसीएफ यांच्याकडून चर्चा…
यावेळी विनायक मुतगेकर डीएफओ आणि एसीएफ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, समस्येची माहिती दिली. त्यावर शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करू अशी हमी दोन्हीं अधिकाऱ्यांनी विनायक मुतगेकर यांना दिली.