October 20, 2026

फ्रिजने घेतला चौघांचा बळी; बेळगांव चव्हाट- ढोर गल्लीतील हृदय पिवटाळून टाकणारी घटना!

0

मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास फ्रीजच्या स्पोटात आई, दोन मुलींसह नणंदेचा होरपळून मृत्यू; गणेश उत्सवाच्या…


IMG_20260916_123026

मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास फ्रीजच्या स्पोटात आई, दोन मुलींसह नणंदेचा होरपळून मृत्यू; गणेश उत्सवाच्या धुंदीत असलेले बेळगाव शहर हादरले!

बेळगांव:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर) (क्राईम)

    काळाच्या पुढे कोणाचे चालत नाही या म्हणीप्रमाणे बेळगांव येथे मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास चव्हाट – ढोर गल्लीत घडलेल्या फ्रीजच्या स्फोटात चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आई दोन मुलींसह नणंदेचा यामध्ये समावेश आहे. सर्वत्र गणेश उत्सवाचा आनंद असतांना या घटनेने बेळगांव जिल्हा हादरून गेला आहे.

    पहाटेच्या सुमारास गाड झोपेतच कुटुंबाला मृत्यूने कवटाळले, चव्हाट – ढोर गल्लीतील धमुणें कुटुंबीय पहाटे 3 च्या सुमारास सुमारास गाड झोपेत होते, त्याचवेळी फ्रिजमध्ये बिघाड होऊन स्फोट झाला, तो इतका भयंकर होता की, काहीं क्षणातच आगीने रुद्ररुप धारण केले अन् होत्याचे नव्हते झाले. परिणामी त्यात अडकलेल्या शारदा गजानन धगुने (वय -47 (आई), प्रिया गजानन धगुने ( वय- 28) , गंगा गजानन धगुने (वय 25) दोन मुलींसह , भारती राजाराम धगुणें (वय- 51) नणंद या चौघींना त्यातून बाहेरच पडता आले नसल्याने यांचा होरपळून मृत्यू झाला तर त्यांचे वडील गजानन राजाराम धगुणें ( वय.65) व त्यांचा मुलगा रोशन धगुणें( वय 21)हेही गंभीर जखमी असून, त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

आई -मुलींची प्रेमाच्या मिठीने मृत्यूला कवटाळले!

     पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पाहणी केली असता, एक धक्कदायक दृष्य दिसून आले, ते म्हणजे आई आणि मुलींचे जिवंतपणी असणारे प्रेम मृत्यूनंतरही कायम राहिले. तिघींनी मिठी मारलेले मृतदेह तसेच घट्ट असल्याचे दिसून आले, त्या दुष्याने घनस्थळी उपस्थित असलेल्यांच्या डोळ्यातून पाणी आले. असे हे भयानक हृदय पिवटाळून लावणारे दृश्य होते.

कशी घडली ही दुर्घटना; आणखी मुलगी रात्रीच घरी निघून गेली अन् वाचली!

   फ्रीजमधील वायरिंग शॉर्ट झाल्याने फ्रीजमधील कॉम्प्रेसरचा हा स्फोट होत असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मध्यरात्री आगीचे लोण बाहेर येताच शेजाऱ्यांना जाग लागली अन् त्यांनी आरडाओरड करून बाजूच्यानाही जागे केले. परिणामी त्यांचे पत्र्यांचे घर असल्याने बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, फार वेळ झाल्याने चौघींचा जागीच मृत्यू झाला तर वडील आणि मुलगा जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले. खानापूरला बिरसे यांच्या घरी दिलेली त्यांची आणखी एक मुलगी लहान मुले घरी असल्याने सोमवारी रात्रीच खानापूरला परतली अन् तिचा जीव वाचला.

बेळगावच्या राजाचे सर्व धार्मिक रद्द करून मंडळाची धगुने कुटुंबियांना श्रद्धांजली!

    याच गल्लीत विराजमान झालेल्या बेळगावचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक गणेश मूर्तीसमोर अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मात्र, या दुःखद घटनेमुळे हे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेवून धगुने कुटुंबाला श्रद्धांजली वाहिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *