मराठी विद्यानिकेतनमधून मराठीत 125 पैकी 124 गुण मिळवत अव्वल स्थान; छत्रपती शाहु प्रकाशन मंडळ बेळगांव व राज्य मराठी विकास मंडळ मुंबई यांच्यावतीने गौरव!
बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आज मातृभाषेकडे पालकांचा कल कमी दिसत असला तरी मातृभाषेतील शिक्षणच उद्दिष्टपूर्तिकडे घेऊन जाते असा आजपर्यंतचा अनुभव आहे. कालच्या जिल्ह्यातील दहावीच्या निकालात मातृभाषेतीलच विद्यार्थी यंदा चमकले आहेत. मराठी विद्यानिकेतन विद्यार्थिनी गर्लगुंजी येथील रहिवाशी प्रतिज्ञा विनोद कुंभार हिने मराठी विषयात 125 पैकी 124 गुण मिळवत उतुंग भरारी घेतली आहे. मातृभाषा जरी मराठी असली तरी त्यामध्ये चांगले गुण मिळवणे तितके सोपे नसते. अथक परिश्रम आणि नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करून तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या उत्तम कामगिरीबद्दल छत्रपती शाहु प्रकाशन मंडळ बेळगांव आणि राज्य मराठी विकास मंडळ मुंबई यांच्यावतीने सन्मान स्मृतिचिन्ह, प्रेरणादायी पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रतिज्ञा कुंभार ही लहानपणापासूनच अभ्यासू आणि हुशार विद्यार्थिनी असून, तिचे प्राथमिक शिक्षण गर्लगुंजी गावामध्ये झाले आहे. पुढारीचे बातमीदार व संत गोरा कुंभार मंडळाचे सचिव परशराम पालकर यांची ती भाची असून, माजी ग्राम पंचायत उपाध्यक्षा रेखा कुंभार व कृषी पत्तीनचे संचालक विनोद कुंभार यांची ती कन्या आहे. तर नाटककार यालाप्पा पालकर यांची ती नात होत.






Leave a Reply