आमदारांना एकेरी भाषेत बोलणे हीच संस्कृती काय? :आ. विठ्ठल हलगेकर..


डोंगरगाव वादंग तालुक्यात राजकीय कोलीत?? ; तालुक्यात कुरघोडीचे राजकारण सामान्यांना मनःस्ताप…??

         

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

          खानापूर तालुका हा सामान्य गोरगरीब सुसंस्कृत माणसांचा आहे, त्याला कोणी कलंक लावण्याचा प्रयत्न करतय का? माझ्याबाबतीत एकेरी भाषेचा वापर करणे हीच तालुक्याची संस्कृती आहे का?? 52 हजार अधिक मतांनी निवडणून आलेल्या व्यक्तीला बदनाम करून त्यांची प्रतिमा अर्थात् नाव कस खराब करणे असेच प्रश्न माझ्या बाबतील तालुक्यात सध्या सुरू आहेत, पण, अशा लोकांनी लक्षात ठेवावे दुसऱ्याला काळ लावण्याच्या प्रयत्नात आपलेच हात केंव्हा काळे होऊन गेलेत हे कळणारही नाही! अशी प्रतिक्रिया आमदार विठ्ठल हलगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. 

         ते म्हणाले की, असाच प्रकार डोंगरगाव या शिरोली ग्राम पंचायत हद्दीत येणाऱ्या गावात एका कार्यक्रमादरम्यान घडली. मी भाषण करत असताना, एकाने मला तू काय कामे केलास, अमुक रस्ता त्या आमदाराने केला, तुझ्या कामाचा हिशेब दे अशा एकेरी भाषेत माजी शिरोली ग्राम पंचायत सदस्य कृष्णा गुरव यांनी केला. त्यावर मी दुसरा कोण आमदार असता, तर तुझे मुंडके मारला असता असे बोललो. असे असताना तोच व्यक्ती माझ्या विरोधात कुणाच्या तरी सांगण्यावरून पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय, तालुक्यातील पत्रकारांनी प्रत्यक्ष डोंगरगावात जावून तेथील लोकांकडून माहिती घेऊन योग्य ती समांतर बातमी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

माझी प्रतिमा अर्थात् नाव खराब करण्यासाठी काहींचा खटाटोप….

     तालुक्यात पहिल्यांदाच मी तब्बल 52 हजार अधिक मताधिक्य घेऊन निवडून आलो आहे, तेव्हांपासून काहीं लोकांनी माझी बदनामी करण्याचा जणू विडाच उचलला आहे. परंतु, अशा लोकांनी लक्षात ठेवावे, दुसऱ्याला काळ लावण्याच्या नादात स्वतःचे हात कधी काळे झाले हेच कळणार नाही! मी अरेरावी वा दादागिरीचा भाषा करेन की नाही हे तालुक्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे, अशीही माहिती आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली.

पत्रकारांनी प्रत्यक्ष डोंगरगावात जावून लोकांकडून माहिती घ्यावी!

           तालुक्याच्या आमदारांनीच सामन्यांवर अरेरावी वा दादागिरीचा भाषा करणे चुकीचे आहे, हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे नेमकी ही घटना काय? यामध्ये कोणाची चुक आहे, कोणी एकेरी भाषेचा वापर पहिल्यांदा केला याचा लोकांमध्ये जाऊन विचार करावा, अनसेल सर्व पत्रकारांना आम्ही त्या गावात घेऊन जाऊ अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते भरमानी पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली…

काय म्हणाले कृष्णा गुरव….

           मी आमच्या भागातील कामांची माहिती विचारली, जंगल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याची योजना सरकारने आखली आहे, पण, नुसतेच पंधरा अशी सरकारी भरपाई परवडणारी नाही, त्यामुळे ही रक्कम वाढवून देऊन त्याचबरोबर बदली जमीनही सरकारने द्यावी अशी आमची मागणी आहे.. शिवाय मी समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, पण आमदारांचा कोणता मागचा राग माझ्यावर होता काय माहीत, त्यांनी माझ्यावर अरेरावीची भाषा केली. हे आमदारांना शोभते काय…? असे मत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडले…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *