ओलमणीत आज रात्री ‘ब्रम्हतेज’ नाटकाचे आयोजन
हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसाद, नाटकाचे आयोजन…
ओलमणी: लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)
ओलमणी (ता. खानापूर) येथे आज हनुमान जयंती उत्साहात साजरी होत आहे, त्यानिमित आज सकाळी पूजा, प्रसाद ग्रहण करण्यात आला. थोड्याच वेळात महाप्रसाद होईल, त्यानिमित हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. तर रात्री प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी ‘ब्रम्हतेज‘ या पौराणिक नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आजुबाजूच्या भाविक, नाटकप्रेमिनी महाप्रसाद व नाटकाचा लाभ घ्यावा असे गावकऱ्यांतर्फे आवाहन करण्यात येत आहे..
