पोलिस अधिकारी जगदीश काद्रोळी यांना मुख्यमंत्री पदक!


उत्कृष्ठ कामगिरीची पोचपावती; जिह्यात आणखी काहीं अधिकाऱ्यांचा सन्मान….

   

बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

   खरोखर पोलिस अधिकारी कसा असावा, लोकांच्या हक्कांचे जतन कसे करावे, त्यांना न्याय कसा द्यावा याचा आदर्श कोणाकडून घ्यावा तर खानापूरचे पोलिस हवालदार जगदीश काद्रोळी यांच्याकडून! त्यांनी जांबोटीमध्ये वर्षभर सेवा केली, त्यांचे आजही जनतेतून चांगला पोलिस म्हणून नाव घेतले जाते. जगदीश काद्रोळी यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेला योग्य तो न्याय मिळवून दिला आहे. चांगला प्रामाणिक आणि कायद्याचे पालन, रक्षण करणारा अधिकारी म्हणून त्यांची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे. त्याचीच पोचपवती म्हणून त्यांना आज मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याहस्ते उत्तम अधिकारी म्हणून पदक बहाल करण्यात आले. यावेळी गृहमंत्री डॉ.जी पी परमेश्वर व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते… या त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे…. लोकहित न्यूज तर्फे जगदीश काद्रोळी यांचे खूप खूप अभिनंदन!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *