कर्नाटकातील राजकीय बद्दल अपेक्षित; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची दिल्लीत वर्णी
बंगळूर : लोकहित न्यूज (विलास कवठाणकर)
. निवडणुकीच्या आधी ठरलेल्या अडीच वर्षांच्या फॉर्मुल्यानुसार उरलेली दोन वर्षे राज्याचे मुख्यमंत्री पद उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे, येत्या दोन दिवसांत या राजकीय घडामोडी घडणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या हायकमांडच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती पुढे येत आहे. यावेळी डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री पद नाही दिले तर सरकार पत्तन होण्याची भीती आहे. त्याचा आढावा घेऊनच हायकमांडने सिद्धरामय्या यांचा राजीनामा घेऊन त्यांची राष्ट्रीय स्तरावर वर्णी लावण्याची वरिष्ठांनी तयारी केल्याचे समजते.
.





Leave a Reply