बालवीर विद्यानिकेतनची प्राजक्ता चौगुले मराठी विभागात जिल्ह्यात प्रथम!


शंभर टक्के निकालासह सलग तिसऱ्या वर्षी अ (A) मानांकन मिळवणारे विद्यालय!

   

बेळगुंदी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         बेळगुंदी ( ता. बेळगांव) येथील बालवीर सोसियल फाऊंडेशन संचलीत बालवीर विद्यानिकेतने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. यंदा विद्यालयाच्या शंभर टक्के निकालासह सलग तिसऱ्या वर्षी अ (A) मानांकन मिळविले आहे. यंदा सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, या विद्यार्थांना बालवीर सोसियल फाऊंडेशन अध्यक्ष प्रेमानंद गुरव, संयोजक शंकर चौगुले, बालवीरचे सर्व पदाधिकारी, माध्यमिक विभागाचे प्रमुख मंगल पाटील, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर यांच्यासह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

कुमारी प्राजक्ता उत्तम चौगुले (98.40 टक्के) जिह्यात मराठी विभागात प्रथम…

     बालवीर विद्यानिकेतने यंदा बाजी मारली असून, कुमारी प्राजक्ता उत्तम चौगुले 98.40 टक्के मिळवत मराठी विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, कुमार पल्लवी सुरज पाटील 97.92 टक्के गुण मिळवत बेळगुंदी विभागात व विद्यालयात द्वितीय क्रमांक, कुमारी अक्षरा धोंडिबा गुरव हिने 96 टक्के गुण मिळवून बेळगुंदी केंद्र व विद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. कुमारी अनुष्का कुमार प्रमोद कनगुटकर 94.4 टक्के, कुमारी समृध्दी संभाजी तुर्केवाडकर 93.76 टक्के,  कुमारी ऋतुजा तारीहाळकर 91.68 टक्के, कुमारी भक्ती बाळेकुंद्री 90.40, टक्के, श्रावणी उघाडे 90.8 टक्के गुण मिळवले आहेत. परीक्षेला एकूण 27 विद्यार्थी बसले होते, त्यामध्ये 16 विद्यार्थी विशेष प्रथम श्रेणीत, 9 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहेत.

दोन विद्यार्थांनी कन्नड विषयात 100 पैकी 100 गुण पटकावले!

       यंदा विद्यार्थांनी एक विशेष कामगिरी बजावली असून, पैकीच्या पैकी मार्कस खेचून आणले आहेत. दोन विद्यार्थांनी कन्नड विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत . पाच विद्यार्थांनी समाज विज्ञान विषयात 100 पैकी 100 मार्कस घेतले आहेत, तर 4 विद्यार्थांनी इंग्रजी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवत एक वेगळा विक्रम केला आहे..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *