जांबोटी राजवाडा रस्त्याचे भाग्य उजळले!


नागरिकांतून समाधान; आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून रस्त्याचा विकास!

  

    

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

       वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या जांबोटी राजवाडा रस्त्याचा अखेर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठवड्यापासून या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. मध्यंतरी काहीं कारणास्तव हे काम स्थगित होते, याची दखल घेत लोकहित न्यूजने आवाज उठवला अन् जांबोटी ग्राम पंचायत सदस्य बाळकृष्ण जांबोटकर तसेच गावातील युवकांनी पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. सध्या या रस्त्याचे काम जोरात सुरू असून, खडीकरण टाकून त्यावर काँक्रिट टाकण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर झाला आहे. त्यातून उत्कृष्ट रस्त्याचे काम होईल अशी माहिती कंत्राटदार सोमकुमार पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

उत्तम रस्त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार…

      काहीं वर्षांनी का असेना पण, रस्त्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. या रस्त्याचे काम उत्तम होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. आमदारांच्या विकासात्मक कृतीला नागरिकांनी सलाम केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *