July 21, 2026

आमदार हलगेकरांनी ‘निकालात’ काढला बैलूर -बाकनूर रस्त्याचा ‘हद्द’वाद’

0
IMG_20260425_110117.jpg

आमदार, जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद! रस्ता कामाबद्दल गावकऱ्यातून समाधान होत आहे..

     

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

             गेल्या अनेक वर्षांपासून बेळगांव आणि खानापूर तालुका हद्दीत सापडलेल्या बैलूर -बाकनूर रस्त्याचा विकास रखडला होता. अखेर लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या समस्येचा पाठपुरावा करत, रस्त्याला भरीव निधी मंजूर करत या रस्त्याला विकास मार्गाला लावले. त्यामुळे रस्ता ‘हद्द’ वाद’ आमदार हलगेकर यांच्या प्रयत्नांनी संपुष्टात आला आहे. याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या या रस्त्याचे काम सुरू असून, त्याची शुक्रवारी आमदार विठ्ठल हलगेकर, जिल्हा भाजप रयत मोर्चा उपाध्यक्ष सदानंद पाटील यांनी बैलूर दौरा करून सदर रस्त्याची पाहणी केली. यावेळी गावचे प्रतिष्ठित पंच तसेच जांबोटी भागाचे प्रभावी भाजप नेते लक्ष्मण झांजरे, जांबोटी सोसायटीचे उपाध्यक्ष पुंडलिक नाकाडी, भाजप कार्यकर्ते मंगेश मुळीक, टी. के. बिर्जे, शिवाजी तुर्केवाडकर, चिल्लापा पाटील, रामू नाकाडी, जोतिबा कोवाडकर, वसंत देसाई, हणमंत कोदाळकर, राहुल आळवणी, सदानंद मासेकर आदी उपस्थित होते.

 

रस्ता कामाबद्दल नागरिकांतून समाधान; लक्ष्मी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात…

   सध्या सुरू असलेल्या बैलूर बाकनूर रस्त्याची पाहणी करण्यासाठी आमदार व त्यांचे सहकारी शुक्रवारी बैलूर दौऱ्यावर होते, त्यांनी यावेळी  विशेषकरून रस्ता कामाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला असता, गावचे पंच लक्ष्मण झांजरे, पुंडलिक नाकाडी यांनी नागरिकांच्यावतीने बोलतांना, रस्ता कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या बैलूर, देवाचीहट्टी, बाकनुर आणि मोरब गावांची मिळून लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर चारीही गावांमध्ये जोरदार तयारी सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून अनेक वर्षांपासून बेळगांव आणि खानापूर सीमा हद्दीत सापडलेल्या बैलूर ते बाकनुर रस्त्याचा विकास रखडला होता. आमदारांच्या विकासात्मक दृष्टीकोणातून या रस्त्याच्या विकासाला गती मिळाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *