

सर्वच विद्यार्थी झाले पास; तालुक्यात जांबोटी पश्चिम भागातील विविध उपक्रमांचे हायस्कूल म्हणून परिचित!
ओलमणी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलीत राजश्री शाहु हायस्कूलने निकालात यंदा शंभरी पार केली असून, परीक्षेला बसलेले सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. खानापूर तालुक्यात जांबोटी पश्चिम भागातील विविध उपक्रम राबविणारी शाळा म्हणून या हायस्कुलची ओळख आहे. परंपरा जपणाऱ्या या हायस्कूलमधून यंदा एकूण 37 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी सर्वच पास झाले आहेत.
कोण कोण नंबरात बसले ते पाहू….
कुमारी पल्लवी रामू गावडे हिने 593 गुण (94.88 टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, कुमारी गायत्री लव राऊत 562 गुण (89.92 टक्के) दुसरा क्रमांक, कुमारी सानिका बाळासाहेब उशिंनकर 539 गुण ( 86.24 टक्के) मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे. यावर्षी 37 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यामध्ये प्राविण्य श्रेणीत 3, प्रथम श्रेणीत 26 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 3 विद्यार्थी तर 5 विद्यार्थी पास श्रेणीत बसले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सी. एस. कदम, सहशिक्षक अजित सावंत व सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे..






Leave a Reply