आमदारांनी नवनियुक्त मंत्र्यांचे स्वागत करतांनाच तालुक्यातील समस्या त्यांच्यासमोर मांडल्या!

बंगळूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
येत्या दोन दिवसांत बंगळूरला सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी बंगळूरला रवाना झाले असून, तेथे पाऊल ठेवताच त्यांनी दोन महत्वाच्या मंत्र्यांची भेट घेतली. साखर मंत्री रुद्रप्पा लामानी यांची भेट घेऊन तालुका आणि लगतच्या साखर कारखान्यांची परिस्थिती सुधारत शेतकऱ्यांच्या ऊसाला अधिक दर देऊन त्यांचा आर्थिक स्तर सुधारण्याची मागणी केली. यावेळी मंत्री लामानी यांचे पहिल्यांदा पुष्प देऊन अभिनंदन केले. त्यानंतर भाजपच्या काळातील उपमुख्यमंत्री तसेच सहकार मंत्री राहिलेल्या तसेच काँग्रेस सरकारच्या काळातही सहकार मंत्री मिळालेल्या बेळगांव जिल्ह्यातीलचआमदार लक्ष्मण सवदी यांचे अभिनंदन करतानाच जिल्ह्यातील सहकार खात्यातील परिस्थिती सुधारण्याची विनंती केली . त्यावर दोन्हीं मंत्र्यांनी खानापूर सकारात्मक प्रतिक्रिया देत खानापूर तालुक्याला विशेष प्राधान्य देण्याची हमी दिली.
सहकार खाते म्हटले तर विषय येतो तालुका डीसीसी बँकेचा; तोच विषय आमदार जोरदारपणे मांडण्याची अधिक शक्यता…?
जिल्ह्यात सहकार खाते मोठ्या प्रमाणात विस्तारले असून, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व घटकांतील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अलीकडच्या काळात बदलाच्या राजकारणामुळे आधीची घडी विस्कटली आहे. त्यामुळे शेतकरी आणि इतर घटकांतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, त्यावर काय करावे ? असाच प्रश्न नागरिकांसह खुद्द आमदार विठ्ठल हलगेकर यांना नाही पडला तर नवलच! आपल्या तेपीनकट्टी कृषी पत्तीनला वाढीव कर्ज मिळाले नसून, तालुक्यातील अनेक संघांचा साधा शेअर्स करून घेण्यात आला नाही. त्यामुळे असे संघ असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खुद्द संतप्त आमदारांनी डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांना पत्र देऊन तात्काळ आपल्या संघासह इतर संघांचेही प्रश्न सोडवण्याची मागणी सदर निवेदनात केली आहे .