लोकहित न्यूज मालिका वृत्ताची डीआरओंकडून दाखल-   जिल्ह्यातील 800 तर खानापूरातील 40 च्या घरात, को – ‘ऑपरेटिव्ह सोसायट्या’ येणार ‘अडचणीत’ !

0

डीआरओ रवींद्र पाटील यांची माहिती; ऑडिट  न झालेल्या बुडीत अवस्थेत असलेल्या सोसायट्या, सहकार खात्याच्या ‘रडावर…


IMG_20260818_155726

डीआरओ रवींद्र पाटील यांची माहिती; ऑडिट  न झालेल्या बुडीत अवस्थेत असलेल्या सोसायट्या, सहकार खात्याच्या ‘रडावर ‘

   

बेळगांव/ खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      लोकहित न्यूजने सुरू केलेल्या ‘या सोसायट्यांचे करायचे तरी काय? या मालिकेची डीआरओंकडून दाखल घेण्यात आली असून, जिह्यातील 800 तर खानापूरातील 40 सोसायट्यांवर कायदेशीर कारवाईचे संकेत मिळत आहेत, कालच लोकहित न्यूज ने डीआरओ रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी वरील माहिती दिली. ऑडिट न होणे, दिलेल्या कर्जांची तसेच वसुलीसाठी केलेल्या कारवाईची अचूक माहिती देण्यास असमर्थ ठरलेल्या तसेच सोसायटी स्थापनेनंतर सोसायटीसबंधित अध्यक्ष – संचालकांची आर्थिक बाबतीतही चौकशी होणार असल्याचेही श्री. पाटील यांनी पुढे बोलतांना स्पष्ट केले.

जिल्ह्यात 4000 हजाराच्या घरात सोसायट्या पण, संचालक अध्यक्षांच्या मनमानीमुळे त्यापैकी बहुतेक सोसायट्या बुडीत’च्या’ मार्गावर….

          बेळगांव जिल्ह्यात 4000 हजारच्या घरात विविध सोसायट्यांची सहकार खात्याकडे नोंद असली तरी त्यातील बहुतेक सोसायट्या संचालक -अध्यक्षांच्या मनमानीमुळे अडचणीत आल्याची माहिती सहकार खात्याकडून मिळत आहे. खानापुरात दोनशेच्या घरात सोसायट्यांची नोंद असून, त्यापैकी अधिक सोसायट्या अडचणीत आल्या आहेत. संचालक मंडळ वा सोसायटी संबंधितांकडून वसुलीचे कारण पुढे करण्यात येत आहे, तशी परिस्थिती मोजक्याच सोसायट्यांमध्ये असेलही कदाचित पण, त्याहून अधिक सोसायट्या संचालक अध्यक्षांच्या मनमानीमुळे अडचणीत आल्याचे मोठे ‘ कारण ‘ आहे.

   

खानापूरातील 107 सोसायट्यांचे ऑडिटच नाही; लवकरच 11 सोसायट्यांवर कारवाईचे संकेत…

     खानापूर -जांबोटी विभागात एकूण दोनशेच्या घरात सोसायट्यांची नोंद असून, त्यातील 107 सोसायट्यांनी तीन वर्षांहून अधिक वर्षे ऑडिटच केलेले नाही. तर लवकरच 11 सोसायट्यांवर कारवाई होण्याचे संकेत सहकार खात्याकडून मिळत आहेत.सिद्धी

खालील सोसायट्यांचे अधिक वर्षे ऑडिट नाही…

क्रांतिसेना बहुउद्देशीय सहकारी संघ  15 वर्ष, निडगलमधील श्री सिद्धेश्वर सोसायटी 7 वर्षे, ग्रामीण महिला को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी 15, हलगा सिद्धिविनायक बहुउद्देशीय सहकारी संघ 15 वर्षे, खानापूर संत गोरा कुंभार बहुउद्देशीय सहकारी संघ – 14 वर्षे या सोसायट्यांचे अधिक ऑडिट झाले नाही! तर 107 पैकी उर्वरित सोसायट्या, दूध संघ, बहुउद्देशीय संघ, कृषी पत्तीन संघांचेही अलीकडच्या काळात ऑडिट न झाल्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे..

प्रतिक्रिया –

  ज्या सोसायट्यांचे दिलेले कर्ज थकले आहे, की, कर्ज घेतलेल्यांनी भरलेच नाही याचा तपास होईल, सोसायटी संचालक -अध्यक्षांनी नियमाप्रमाणे कर्ज घेतले आहे काय, सोसायटीच्या माध्यमातून घेतलेली मालमत्ता आणि संचालक -अध्यक्ष यांची सोसायटी स्थापनेनंतरची आर्थिक स्थितीचीही चौकशी आम्हाला करावी लागणार. कारण ठेवीदारांच्या तक्रारींचा पाऊस पाहता कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल..

   –रविंद्र पाटील, डीआरओ.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed