मित्रहो जिवंतपणी आई वडिल, आपल्या माणसांची सेवा करा, आपल्या माणसांची घ्या; सत्यशोधक पद्धतीने पार पाडल्या दशक्रिया विधी !
अहिल्यानगर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
चक्क जिवंतपणी स्वतःची दशक्रिया अर्थात मरणानंतर दहाव्या दिवशीचे पिंडदान करण्याच्या प्रयोग अहिल्यानगर जिल्ह्यातील सौदाळा शेजारच्या भेंडा बुद्रुक गावात करण्यात आला. त्यामध्ये बऱ्याच छोट्या -छोट्या अंधश्रद्धक गोष्टींतून मोठ्या गोष्ठी जन्म घेतात हेच सिद्ध होतांना दिसत आहे. महात्मा जोतिबाराव फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने येथील सौदळा ग्राम पंचायत सरपंच ( अध्यक्ष) शरद आरगडे यांनी जिवंतपणी ‘घातलं स्वतःच दहावं’! अर्थात काय तर प्रत्येकांच्या मरणानंतर दहाव्या दिवशी केल्या जाणाऱ्या दशक्रिया शरद यांनी जिवंतपणी करून दाखवल्या, त्यातून कावळ्यासह प्रत्येक प्राणी पक्ष्याला खाऊ घातले ते खाणारच, असेच दिसून आले. जिवंतपणी आई-वडिलांसह आपल्या माणसांची सेवा करा, त्यांच्यावर प्रेम ठेवा असाच संदेश मिळाला.
जिवंतपणी सत्यशोधक पद्धतीने पार पाडल्या (दशक्रिया ) ‘पिंडदान’…
सत्यशोधक पद्धतीने बहुजन समाजाचे अभ्यासक भीमराव कोथिंबीरे यांनी स्मशानातच सरपंच शरद आरगडे यांचं जिवंतपणी दहावं घातलं , अर्थात दशक्रिया (पिंडदान) पार पाडल्या.
सरपंचांनी शंभर रुपयेच्या बाँडवर लिहून ठेवले, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडण्यासारख्या प्रथा बंद करा…
जुन्या सामान्य पद्धती बंद व्हाव्यात; नवऱ्याच्या निधनानंतर मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, विधवा म्हणून समाजात दुहेरी स्थान मिळणे सारख्या प्रथा कायमच्याच बंद झाल्या पाहिजेत, म्हणून सौंदळा ग्राम पंचायत अध्यक्ष (सरपंच) (जिल्हा अहिल्यानगर) शरद आरगडे यांनी शंभर रुपयेच्या बाँडवर लिहून ठेवले आहे. ते म्हणतात, माझ्या मरणानंतर माझ्या बायकोच्या बांगड्या फोडणे, मंगळसूत्र तोडणे, माझ्या पश्चात समाजात चुकीची वागणूक देऊ नये असा उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी सदर बाँडवरील मुद्दे सर्वांसमोर वाचून दाखवण्यात आले.

प्रतिक्रिया –
मित्रहो, आई वडिलांची जिवंतपणी सेवा करा, त्यांचा आदर राखा! आपल्या जवळच्या माणसांना जिवंतपणी समजून घ्या. मरणानंतर केलेली सेवा ,क्रिया , भक्ती भाव आणि तुमचे प्रेम मृत आत्म्यांपर्यंत पोहचतेच अस नाही! तुम्हीं जिवंतपणी करता तेच खरे, असे आम्हीं मानतो…
– शरद आरगडे, सरपंच ( अध्यक्ष) सौदळा ग्राम पंचायत, (जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र).

प्रत्येक प्राणी पक्ष्याला खाऊ घातले तर ते येणारच, कावळ्याच्या रूपात मृत आत्मा येतो, त्याला पिंड दान केले पाहिजे, तरच तो आत्मा मोक्ष पावतो या सर्व चुकीच्या समजुती आहेत, म्हणूनच आज आम्हीं खुद्द सरपंचांच जिवंतपणी दहाव वाढण्याचा कार्यक्रम ठेवला होता. त्यातून आम्हांला समोरासमोर या सर्व असल्याचे अंधश्रद्धा दिसून आले.
– भीमराव कोथिंबीरे, बहुजन समाजाचे अभ्यासक, भेंडा बुद्रुक जिल्हा अहिल्यानगर…