मूडलगी तालुक्यातील नागनूर येथील घटना;या घटनेची मूडलगी पोलिस ठाण्यात नोंद; तालुक्यात हळहळ…
बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) क्राईम
शेतात काम करत असतानाच विजेचा धक्का लागून दांपत्याच्या मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी( दि.14) बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यात नागनूर गावात घडली.
मुथप्पा श्रीशैल मुगोळखोड (४२) आणि त्यांची पत्नी राजश्री मुगोळखोड (३६) असे मृत दाम्पत्याचे नाव असून, या घटनेची नोंद मूडलगी पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. ही घटना उघडकीस येताच कुटुंबीयांना धक्का बसला असून नागनूर गावात शोककळा पसरली आहे.
