IMG_20260714_222021

संपादक:  विलास कवठणकर..

प्राथ.शाळा, हायस्कूल आणि कॉलेजना ‘अटेंडर सीट’  किती रुपयांची?

सामाजिक सेवेच्या नावाखाली ट्रस्ट ,सामाजिक संस्थांची पैशे घेतल्याची जोरदार चर्चा; शिक्षण खात्याने हात झटकले…

लोकहित ‘बात अंदर की ‘ न्यूज ( स्पेशल रिपोर्ट) – भोंगळ घोटाळा भाग – 1

बेळगांव:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

जांबोटी पश्चिम भागासह जिल्ह्यातच एकूण 465 प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि कॉलेजना शैक्षणिक वर्षाच्या (जूनपासून) पहिल्या दिवसापासून हेडमास्तर (मुख्याध्यापक) सहाय्यक अर्थात ‘अटेंडर’ ची नेमणूक करण्याची परवानगी जिल्हा आणि राज्यातील सामाजिक संस्था आणि ट्रस्टनी सरकारकडे मागितली होती, त्यानुसार खरोखरच हेडमास्तरना मदत होऊ शकते या अनुषंगाने सरकारने सदर मागणी मान्य करत, अनुमती दिली. आणि त्यानुसार वरील वरील नमूद केलेल्या प्राथमिक शाळा,माध्यमिक शाळा आणि कॉलेजना अटेंडर नेमणूक करण्यात आली खरी पण, सामाजिक सेवेच्या नावाखाली ‘लाखोंची बोली’ लावल्याची माहिती लोकहित न्यूज’च्या हाती लागली आहे.

तुम्हांला पाच वर्षे नोकरी देऊन पर्मनंट करतो म्हणून मधल्या एजंटांकडून युवकांची फसवणूक?
     एजंटाकडून  गोर गरीब मुलांना
भुलथाप घालून डावे दाखवून उजवे मारणे या म्हणीप्रमाणे, तुम्हांला पाच वर्षे नोकरी देतो, त्यानंतर कामावर ‘पर्मनंट’ करतो म्हणून पैशे उकळल्याची धक्कादायक माहिती ‘लोकहित न्यूज’ च्या हाती लागली आहे.

बीईओ ऑफिसने हात झटकले; काय आहे हा प्रकार…
याबाबत बीईओ ऑफिसमध्ये विचारले असता, आमचा या नेमणूक पदासाठी कोणताच संबंध नसून, आम्हीं उलट संबधित शाळांना सावध केल्याची माहिती लोकहित न्यूज च्या प्रतिनिधीला दिली. सामाजिक संस्थांमार्फत या पदाची नेमणूक केली असून , तसा प्रकार उघडकीस आल्यास सरकारच्या निदर्शनास आणून द्यावा, कोणीही पैशे देऊ नये असेही आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले.

उद्याच्या भागात सविस्तर माहिती प्रसिद्ध करू…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed