जांबोटी स्मशानभूमीशेड समस्येवर ‘ निघणार’ तोडगा! अरुण (महाराज) कणगुटकर यांचे पालकमंत्र्यांना (बंगळूरला) निवेदन!

0

पालकमंत्री सतीश जार्कीहोळी लवकरच जांबोटी दुर्गा मठ ( मंजुनाथ महाराज) मठाला भेट देणार; अनेक मान्यवरांची…


IMG_20260814_085644

पालकमंत्री सतीश जार्कीहोळी लवकरच जांबोटी दुर्गादेवी श्री मंजुनाथ ( मंजुनाथ महाराज) मठाला भेट देणार; अनेक मान्यवरांची उपस्थिती!

बेळगांव/ जांबोटी : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर)

       

जांबोटी हे खानापूरच्या पश्चिम भागाचे केंद्र असतांनाही याठिकाणी अद्याप स्मशान शेड नाही, पूर्वापार परंपरेनुसार जांबोटी नाक्याजवळील जंगलात  स्मशान म्हणून भूमी म्हणून अंत्यसंस्कार केले जातात मात्र, ही जागा वनखात्याच्या हद्दीमध्ये येत असल्याने वनखात्याचे अधिकारी त्याठिकाणी स्मशान शेड उभारण्यास अडती आणत आहेत, तरीही जांबोटीतील प्रसिद्ध महाराज अरुण (महाराज) कणगुटकर यांच्या सेवाभावी दृष्टिकोनातून तसेच येथील सेवाभावी संघाच्या माध्यमातून स्मशान जागेच्या ठिकाणी स्मशान शेड उभारण्याचे साहित्य आणि लोखंडी रॉडची व्यवस्था करण्यात आली आहे, पण तरीही वनखाते ते उभारण्यास परवानगी देत नाही, त्याविरोधात काल बंगळूर येथे अरुण महाराज कणगुटकर यांच्या पुढाकाराने बेळगावचे पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांची भेट घेऊन तात्काळ ही समस्या सोडवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले, त्यावर पालकमंत्री जार्कीहोळी यांनी लवकरच यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. त्यामुळे जांबोटीसाठी असलेली मोठी समस्या सुटण्याची शक्यता आहे. यावेळी धारवाड हायकोर्ट अधिकारी अश्विनी वेर्णेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील, रविंद्र पाटील, नित्यानंद वेर्णेकर, पंकज चौगुले, किरण कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

जांबोटीत अनेक वर्षांपासून स्मशान भूमी आणि शेड उभारण्याची समस्या कायम; सरकारदरबारी प्रयत्न अवश्यक!

खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागाचे केंद्र म्हणून जांबोटीची ओळख आहे. पण, कित्येक वर्षांपासून या गावात स्मशान भूमीची व्यवस्था नाही. पूर्वापार चालत परंपरेनुसार जांबोटी नाक्याजवळ चोर्ला रोडपासून काहीं अंतरावर वनखात्याच्या जमिनीत या गावातील नागरिकांचे अंत्यसंस्कार केले जातात मात्र, वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे याठिकाणी अद्याप स्मशान शेड उभारण्याचे काम होऊ शकले नाही. पूर्वीपासून त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याने त्याच ठिकाणी स्मशान शेड उभारण्यास कोणतीच अडचण नसतांनाही वनखात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक या कामात आडकाठी आणत आहेत, तरीही जांबोटीचे प्रसिद्ध महाराज अरुण (महाराज) कणगुटकर यांनी सेवाभावी दृष्टिकोनातून सदर स्मशान ठिकाणी शेड उभारण्याचे साहित्य आणि प्रेत जाळण्याचे लोखंडी रॉडची व्यवस्था करून दिली आहे. परंतु, त्याठिकाणी शेड उभारण्यास वनखाते जाणीवपूर्वक अडती देत आहे. यावर शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांही निवेदने, पूर्वकल्पना देऊन झाल्या तरीही गेंड्याची कातडी परिधान केलेल्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडणे कठीण झाले आहे. यासाठी गावकऱ्यांनीही मोठा लढा उभारून सर्वांसाठी मोठा असलेला हा प्रश्न सोडवून घेण्याची गरज आहे. पूर्वापार परंपरेनुसार त्या ठिकाणी स्मशान ठिकाण असल्याने त्याच ठिकाणी स्मशान शेड उभारण्यास कोणतीच हरकत नाही, त्यासाठी नागरिकांनी जोर केला तर हा प्रश्न निकालात येऊ शकतो….

जटगे – हालसाल रस्ता विकासाबाबत चर्चा…

   जटगे – हालसाल रस्ता विकासाबाबत जटगे ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यांनी समस्या मांडली. त्यावर पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांनी यासंदर्भात सरकारदरबारी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

आमदार साहेब जरा हिकडे लक्ष द्या….

    जांबोटीसाठी स्मशान भूमी शेड समस्या मोठी असून, त्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्मशानच्या ठिकाणी शेड नसल्याने गेल्या महिन्यात मोठ्या पावसात एक प्रेत अर्धवट जळाल्याची धक्कादायक घटना घडली . त्यामुळे ही समस्या गंभीर असून, तात्काळ निकालात काढण्याची नितांत गरज आहे…

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed