हार न मानता,जिंकतो तोच खरा ‘बाजीगर’ : डीसी महंमद रोशन…

0

जांबोटी माध्यमिक शाळेत रॉयल राऊंड टेबल कुस्ती मॅटचे उद्घघाटन; विद्यालयाचे आधुनिक ‘रूप’ पाहून जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘वाव’…


IMG_20260815_060616

जांबोटी माध्यमिक शाळेत रॉयल राऊंड टेबल कुस्ती मॅटचे उद्घघाटन; विद्यालयाचे आधुनिक ‘रूप’ पाहून जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘वाव’ असे उदगार….

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     जांबोटीचे वातावरण, येथील शिक्षण पद्धत पाहून मी भारावून गेलो आहे, येथील गुरुजनांच्या उत्तम शिक्षणामुळे सर्वच बाबतीत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कष्टाळू आणि हुशार असल्याचे सांगताच, अनेकवेळा हार पत्करून जिंकतो तोच खरा बाजीगर असे, उद्धगार जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी काढले. विद्यार्थांनो समोर एकच दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, एक ना एक दिवस तुमचाच असेल, तुमच्या अशा खडतर परिश्रमातून एकदोन नाही तर वर्षाला शंभर विद्यार्थी आयएएस, आयपीएस बनतील असा, असा माझा विश्वास आहे असेही ते म्हणाले. मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी स्वागत केले. विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.   जांबोटी (तालुका खानापूर )येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात बेळगाव रॉयल राऊंड टेबल च्या वतीने कुस्ती मॅट तयार करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते

व्यासपीठावर बेलगाम रॉयल राऊंड टेबल चे चेअरमन श्री वरून पाटील. बेळगाव फाउंड्री क्लस्टरचे संचालक आनंद देसाई, कार्तिक मिस्कीन , रोहन सुंठणकर आयुष्य दालमिया, क्रीडा भारतीचे राज्याध्यक्ष अशोक शिंत्रे, लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, माजी जिल्हा जयराम देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेत पाऊल टाकताच,’ वाव अती सुंदर’ : जिल्हाधिकाऱ्यांचे उद्गगार

    माध्यमिक विद्यालयाचे आधुनिक वर्ग पाहुन वाव अती सुंदर असे मनातून उद्गगार जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी शाळेत पाऊल टाकताच काढले. अशा ग्रामीण भागातही शाळेची आधुनिक सुधारणा पाहून मला खूप आनंद वाटला, विश्वाभारत सेवा समिती, शाळा सुधारणा समिती आणि मुख्याध्यापक सहशिक्षकांचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे असेही ते यावेळी म्हणाले.

विद्यार्थांच्या जीवनात नक्कीच बद्दल घडतील असे मार्गदर्शन…

यावेळी पुढे बोलतांना, जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी, “विद्यार्थी दशेत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाचे आहेत. अपयश आल्यानंतर खडतर परिश्रमाने त्याचे यशात रूपांतर करणे हे ज्याला जमतं ते यशस्वी होतात. जांबोटी माध्यमिक विद्यालयात चा सुंदर परिसर, कष्टाळू शिक्षक वर्ग आणि प्रचंड आत्मविश्वास असणारे विद्यार्थी पाहून खूप आनंद होत, “आपले लक्ष निश्चित करून आपण त्या दिशेने परिश्रम केले पाहिजेत. कष्ट करणाऱ्यांना कधीच त्यांची आर्थिक परिस्थिती आड येत नाही. आज अनेक आयएएस अधिकारी आहेत जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून घडले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता भविष्य घडविण्यासाठी समर्थ असले पाहिजेत असेही ते म्हणाले.

विद्यालयाच्या शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचे कोड कौतुक…

  शहरातील विद्यालयांसाठी आपल्या विद्यालयाचे रोल मॉडेल सांगतानाच. विद्यालयाच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल मी खूप कौतुक करतो असेही जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी म्हटले.

जिल्हाधिकारी महमद रोशन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी  रोहित सिंग यांच्याहस्ते फीत कापण्यात आले…

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी  रोहित सिंग यांनी फीत कापून कुस्ती व्यायाम शाळेचे उद्घाटन केले.

यावेळी वरून पाटील, आनंद देसाई यांची समायोजित भाषणे झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच विद्यालयाच्या विकासासाठी आपण नेहमी सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

ऑलिंपिक विजेत्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘सन्मान’…

यावेळी कुस्ती राज्यस्तरीय मिनी ओलंपिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थिनीं श्रावणी भरमाना पाटील (कुसमळी), भक्ती मनोहर गावडे ( मोदेकोप),  तनुजा रवींद्र गुरव (खानापूर),  त्रिवेणी विठ्ठल गावडे ( आमगाव) यांचा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष ‘सन्मान’ करण्यात आला. गावातील युवा वर्ग पंचमंडळी व पालक वर्ग उपस्थित होते. सहशिक्षक दिनकर पाटील यांनी आभार मानले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *