दोन्हीं समस्यां तात्काळ सोडवू, जिल्हाधिकारी महमद रोशन यांची नागरिकांना हमी…
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
वनखात्याच्या आडतीमुळे अनेक वर्षांपासून जांबोटी स्मशानभूमी शेडचे काम थांबले आहे, त्यामुळे नागरिकांना मरणानंतर वेदना सहन कराव्या लागताहेत, तरी आपण तात्काळ स्मशान भूमी शेडची समस्या सोडवावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांनी केली. यावर जमिनीची अदला- बदल करून समस्या ही समस्या सोडवण्याबाबत विचार करण्यात येईल असे सांगतानाच, स्मशान भूमी जागेची मॅपद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तसेच पंचायतीद्वारे कागदोपत्री दखल घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जांबोटी पेठेत कमी सदस्य संख्या वाढवून द्या…
जांबोटी पेठेत जास्त लोकसंख्या असतांनाही दोनच सदस्य कार्यरत असल्यामुळे विकास खुंटला आहे, त्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर आणखी एक सदस्य जागा वाढवून द्या अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे नागरिकांनी केली. यावे नक्कीच विचार करू अशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिली.
यावेळी सुदेश कुडतरकर, मारुती हळब, मिलिंद डांगे, दौलत कोलिकर, मिथुन कुंभार, संतोष कुर्लेकर, सचिन कुडतरकर, इकबाल, महेश जांबोटकर, राजाराम सडेकर आदी नागरिक उपस्थित होते.