त्या वेड्यानेच सिद्धेश्वर मंदिरसह त्या भागातील गवतगंजीला आग लावण्याची अनेक कृत्ये केल्याचा पोलिसांचा ठाम विश्वास…
फोटो – 1) चोरीतील संशयित वेडा व्यक्ती. 2) पोलिसांच्या म्हणण्यानुसार सदर वेड्या व्यक्तीने लगतच्या गवत गंजीना आग लावल्याने गवतगंजी, गुरांचा गोटा आणि त्यामध्ये असलेली जनावरेही भस्मसात झाली आहेत…
खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
तालुक्यासह कोटी हिंदू धर्मियांच्या भावनेला (अस्था) दुखापत पोहचवणाऱ्या नीडगल (ता. खानापूर) येथील प्राचीन जागृत श्री सिद्धेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांनी एका वेड्या व्यक्तीला अटक करून चौकशी सुरू केली आहे खरी पण, पोलिसांचा तपास त्या वेड्याच्या पुढे जाईना अन् गावच्या लोकांची त्यावर विश्वास बसेना. त्यामुळे पुढे काय? होणार या प्रकरणाचे, असाच प्रश्न तमाम तालुकावासियांना पडलेला आहे. मंदिराची तोडफोड त्या वेड्या माणसानेच केली असून, त्याच्या हाताला दुखापत झाली आहे शिवाय त्याचा एक अंगठा तुटून घटनास्थळी त्याचे रक्त पडले असून, ते रक्त नेमके त्याचेच आहे की, आणखी कोणाचे याची खात्री करण्यासाठी सदर वेड्या व्यक्तीचे रक्त डीएनए तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. हे कृत्य त्या वेड्याचे नसून, दुसऱ्या सराईत गुन्हेगारांचा या प्रकरणात हात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिस आम्हाला सहीसाठी पोलिस ठाण्यात बोलवत आहेत पण, आम्हीं जाणार नसल्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.
एकाचवेळी दोन -दोन ठिकाणी मंदिरांची मोडतोड एक व्यक्ती कसा करू शकतो?
निडगल आणि थोड्या अंतरावरील खेमेवाडीतील मंदिराची मोडतोड एकाचवेळी एक व्यक्ती करणे सध्यच नाही, यामागे आणखी काहीं लोकांचा हात असलाच पाहिजे असा गावकरी आणि तालुकावासीयांचा ठाम विश्वास आहे. पण, पोलिस कोणत्या दिशेने तपास करताहेत हे कळेनासे झाले आहे. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा अशी जोरदार मागणी गावकरी आणि तालुक्यातील तमाम जनता करीत आहे.
मंदिर मोडतोडसह परिसरातील गावात गवत गंजीना त्या वेड्यानेच आग लावल्याचे पोलिसांचे म्हणणे ….
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपी वेडा असला तरी त्यानेच मंदिर मोडतोडसह परिसरातील गवत गंजीना आग लावण्यासाठी कृत्ये केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच दिशेने आम्हीं तपास करत आहोत असेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
देवधर्म आणि घडलेल्या घटनेच्या चौकशीनुसार ‘त्या वेड्या’ व्यक्तीचे ते कामच नव्हे: तालुका नागरिक…
गावकऱ्यांनी देवधर्मनुसार तसेच घडलेल्या घटनेप्रमाणे चौकशी केली असता, हे काम त्या वेड्या व्यक्तीचे नव्हेच, असे गावकरी आणि तालुक्यातील तमाम नागरिक हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. पोलिसांनी न भटकता गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी तालुकावासियांतून करण्यात येत आहे..
तालुका भाजप, काँग्रेस तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून तात्काळ या प्रकरणाचा छडा लावण्याची पोलिसांकडे मागणी….
तालुका भाजप आणि काँग्रेस तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पीआय गवंडी यांची भेट घेऊन तात्काळ या प्रकरणाचा छडा लावण्याची लावण्याची जोरदार मागणी केली आहे. परंतु, अद्याप तरी पोलिसांकडून म्हणावा तसा तपास झालेला नाही असेच तालुक्यातील नागरिकांचे म्हणणे आहे…
