पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांच्याकडे माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांची निवेदनाद्वारे मागणी…
बेळगांव : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांच्या सध्याच्या माध्यमनिहाय वाटपाबाबत पुनर्विचार करण्यासंदर्भात गर्लगुंजी माजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील व तालुका युथ काँग्रेसचे अध्यक्ष साई सुदर्शन यांनी राज्य बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
काय आहे सदर निवेदनात…
शिक्षक भरती नोटीफिकेशन मध्ये मराठी माध्यमावर जो अन्याय झाला त्या संबंधी चर्चा करण्यात आली आणि त्वरित मराठी माध्यमासाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी फक्त खानापूर तालुक्यात 195 मराठी शिक्षकांची कमी आहे. त्याचबरोबर पूर्ण कर्नाटक मध्ये 580 ते 650 शिक्षकांची कमी आहे , त्यामुळे मराठी माध्यमातील शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. वरील परिस्थिती लक्षात घेता, कर्नाटक सरकारला सध्याच्या भरती अधिसूचनेचा त्वरित आढावा घेऊन अधिसूचना जारी करावी, तसेच जिथे खरोखरच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जिथे खरोखरच रिक्त जागा उपलब्ध आहेत, तिथे त्या जागांचा समावेश करण्यासाठी सध्याची अधिसूचना रद्द करून सुधारित प्रक्रिया राबवावी.
भरती प्रक्रिया अशा प्रकारे राबवण्याचा विचार करावा ज्यामुळे आवश्यक पात्रता आणि संबंधित भाषिक माध्यमाचे कौशल्य असलेल्या पात्र उमेदवारांना संबंधित पदांसाठी स्पर्धा करण्याची समान संधी मिळेल आणि ‘आरटीई (RTE) कायदा २००९’ अंतर्गत शिक्षकांचे प्रमाण (शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर) पूर्ण करता येईल. यानुसार विचार व्हावा, तसेच संविधानातील अनुच्छेद ३५०-ए आणि ‘आरटीई कायद्या’ची उद्दिष्टे लक्षात घेऊन, भाषिक अल्पसंख्याक मातृभाषा माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलांना पात्र शिक्षक उपलब्ध होतील याची खात्री करावी.अशा आशयाचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले.निवेदनाचा त्वरित पाठपुरावा करू शिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत मार्ग काढू अशी हमी पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी महांतेश कोळूचे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.