तिलारीचे पाणी बेळगावला वळण्याची योजना; उद्या (22) जिल्हाधिकारी कार्यालात पालकमंत्र्यांसोबत बैठक…

0

भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची आवश्यकता अधिक भासणार ; राकस्कोप डॅममध्ये पाणी सोडणार… बेळगांव : लोकहित…


Screenshot_20260821_180154

भविष्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची आवश्यकता अधिक भासणार ; राकस्कोप डॅममध्ये पाणी सोडणार…

बेळगांव : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

    दिवसेंदिवस बेळगांव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुख्य गरज म्हणून ओळखला जाणारा पाणी प्रश्न भेडसावणार आहे, त्याचा आतापासून त्याचा विचार जिल्हा प्रशासनाने केला असून, भविष्यात पाणी समस्या भासू नये म्हणून सावंतवाडी (महाराष्ट्र) तालुक्यातील तिलारी धरणातील पाणी बेळगावला वळण्याची योजना सरकारने आखली असून, (उद्या ,शनिवारी दि.22)  जिल्हा पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांच्यासोबत जिल्हाधिकारी महमद रोशन यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. सध्या शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा होतो, परंतु वाढत्या लोकसंखेबरोबर पाणीप्रश्नही तीव्र होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिलारी धरणातील पाणी राकसकोप जलाशयात वळविले तर पाण्याचा योग्य पुरवठा होईल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे, पण महाराष्ट्राकडून पाणी मिळणार का? एरवी मराठी आणि सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राबद्दल आगपाखड करणाऱ्या कर्नाटक सरकारला महाष्ट्राचे पाणी कसे?  चालते असा प्रश्न आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed