अध्यक्ष -संचालकांच्या मनमानी’मुळेच जास्तीनजास्त ‘सोसायट्या’  बुडताहेत…

0

जिल्ह्यातील बहुतेक सोसायट्यांनी नांगी टाकली; जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत को -ऑपरेटिव्ह सोसायट्यांची स्थिती आजच्या घडीला ‘बरी’…


Screenshot_2026-08-02-07-28-10-42_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

जिल्ह्यातील बहुतेक सोसायट्यांनी नांगी टाकली; जिल्ह्यात हजारोंच्या संख्येत को -ऑपरेटिव्ह सोसायट्यांची स्थिती आजच्या घडीला ‘बरी’ नाही

    – लोकहित न्यूज वृत्त सोसायटी विश्लेषण !

     –विशेष संपादकीय

     19 आणि 20 व्या शतकापासून असलेल्या सावकारशाहीने जग व्यापले होते, 1840  च्या काळात त्याचे अधिकच प्रमाण वाढले. त्यामुळे गरीबांचे शोषण मोठ्या प्रमाणात वाढले होते,या समस्येने व्याकूळ बनलेल्या रॉबर्ट ओवेल यांनी 1844 साली ब्रिटनमध्ये सहकार क्षेत्र सुरू केले तर इंग्लंडमध्ये रॉडचेल सोसायटी ही जगातील पहिली संस्था ठरली. तर भारतामध्ये 1905 साली कर्नाटकातील पहिली सोसायटी (संस्था) गदग जिल्ह्यात कानगीहालन येथे सुरू झाली. त्याआधी 1904 साली भारतात राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी त्या काळातील गोरगरिबांचे सावकारांकडून होत असलेले शोषण पाहून सार्वजनिक सहकार क्षेत्राला मान्यता देत तसा कायदा संमत केला.

मात्र, तरीही सावकारशाहीचे जाळे जोरात पसरले होते….

आधी मोठ्या प्रमाणात धुडगूस घातलेल्या सावकारशापुढे सामान्य नागरिकांनी हात टेकले होते, कर्ज घेतलेल्या संबंधित सावकारांकडून घेतलेल्या राखमेइतकेच व्याज आणि वरून नाहक त्रास तो वेगळाच! अशा अवस्थेत जगणे म्हणजे त्याकाळी जणू नरकच वाटायचे, त्यामुळे हलक्या जीवाच्या अनेकांनी याला कंटाळून जीवाला कवटाळले अर्थात जीवनाचा अंत करून घेतला. पण, तरीही त्यांच्या वारसांना तो फास चुकला नाही. त्यामुळे त्याकाळी काहींनी सहन न झाल्याने आपल्या वडलोपार्जित जमिनीही सावकारांच्या स्वाधीन केल्याचा इतिहास आहे, त्यातूनच उदय झाला तो सहकार खात्याचा! त्या त्या भागातील समूहाने मिळून सोसायटी अर्थात सहकारी को – ऑपरेटिव्ह संस्था स्थापन करणे होय!  साधारण 1960 नंतर काळात हळूहळू सहकाराचे क्षेत्र वाढत गेले आणि त्याचा खरा विस्तार 1995 ते 2005 च्या दरम्यान झाला. किराणा दुकानाप्रमाणे बेळगांव आणि खानापुरात को ऑपरेटिव्ह सोसायट्यांचे जाळे जिल्हाभर गल्लीबोळात झाले. जिल्ह्यात सध्या 5000 हजाराच्या घरात विविध माध्यमातील सोसायट्या आहेत, पण, सध्या त्यातील हजारो सोसायट्यांची हालत बेकार आहे असेच म्हणावे लागेल.

कर्नाटकातील सहकार क्षेत्राचा इतिहास काय आहे…

कर्नाटकातील सहकार चळवळीची सुरुवात १९०५ मध्ये गदग जिल्ह्यातील कानगीनहाल येथे झाली, जिथे सिद्धाणगौडा एस. आर. पाटील यांनी  भारतातील पहिली कृषी पतसंस्था स्थापन केली. ब्रिटिशांच्या काळात व म्हैसूर संस्थानात ग्रामीण कर्जमुक्तीसाठी या चळवळीचा विस्तार झाला. पुढे १९५९ चा कायदा व १९९७ च्या सौहार्द कायद्यामुळे या क्षेत्राला स्वायत्तता व नवी दिशा मिळाली.महत्त्वाची टप्पून व कायदेपहिली संस्था (१९०५): कानगीनहाल (गडग जिल्हा) येथे आशियातील व देशातील पहिली सहकारी पतसंस्था सुरू झाली.जनक: श्री सिद्धाणगौडा एस. आर. पाटील यांना कर्नाटकातील सहकार चळवळीचे जनक मानले जाते.कायदे: राज्याìल सहकार क्षेत्राच्या नियंत्रणासाठी व विकासासाठी कर्नाटक सहकारी संस्था कायदा, १९५९ आणि कर्नाटक सौहार्द सहकारी कायदा, १९९७ लागू करण्यात आले.

   चुकीचे नियोजन आपल्या जवळच्या आणि पै -पाहुण्यांना कर्ज देणे, सोसायटीच्या माध्यमातून विविध व्यवसाय नियोजन नसतांनाही सुरू करणे, काहीं ठिकाणी तर सोसायटीचे पैशे वापरून जागा, शहरात प्लॉट घेऊन अध्यक्ष- संचालक गडगंज झाले असल्याचे चित्र आहे, अशा कारणांमुळेच सोसायट्या बुडताहेत असे सहकार खात्यातील जानकर सांगतात….

प्रतिक्रिया –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed