राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये सुपर ‘स्पेशालिटी’ हॉस्पिटलची व्यवस्था: मुख्यमंत्री सिद्धरामय्या..


शनिवारी बेळगावातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह विविध कामांचे लोकार्पण…

बेळगांव: लोकहित न्यूज ..

     आमचे सरकार गोरगरिबांसाठी असून, विशेषकरून आमच्या काँग्रेस सरकारच्या योजना ह्या सामान्य नागरिकांना दिलासादायक असतात. त्यातील एक भाग म्हणून राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये ‘सुपर स्पेशालिटी ‘ हॉस्पिटलची उभारणी आम्ही केली आहे, असे सांगतानाच ‘शक्ति’ योजनेची जागतिक पातळीवर नोंद झाल्याचे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले. शनिवारी (दि.4) बेळगांव येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसहसह विविध विकासकामांचे त्यांच्याहस्ते लोकार्पण झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बेळगांव उत्तरचे आमदार राजू शेठ यांनी उपस्थित होते.

  यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री शरण प्रकाश पाटील यांनी बोलतांना सांगितले की, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खासगी रुग्णालयांप्रमाणे काम चालणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सेवा रुग्णांना कमी पडणार नाही. पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांनी स्वागत करतांना बेळगावात आज वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रकल्पांचे लोकार्पण होत, असून गरीब आणि सामान्य जनतेसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे, असे सांगितले. बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बोलतांना सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात असे स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणार असून, त्याचा सामान्य जनतेने लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

…विविध विकासकामांचे लोकार्पण…

      बेळगावात शनिवारी विविध विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या सिटी बस स्टँड , गृह वैद्यकीय अधिकाऱ्यांचे  वसतिगृह तर राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत निर्माण होणाऱ्या नूतन इमारत बांधकामाचेही यावेळी उद्घघाटन करण्यात आले.

चौकट –

लवकरच बेळगावात कॅन्सर स्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी

        सध्या देशात वेगवेगळ्या कॅन्सर आजारांमुळे जनता घायाळ आहे, परिणामी ब्लड कॅन्सरमुळे तर दगावणाऱ्यांची संख्या वाढती असून, त्याचीच दखल घेत  सरकारने बेळगावात ‘ कॅन्सर स्पेशालिस्ट ‘ हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आरोग्य मंत्र्यांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांनी बोलतांना दिली.

    यावेळी राज्य वाहतूक मंत्री रामलिंग रेड्डी, उच्च शिक्षण मंत्री एम. शी. सुधाकर  , आमदार राजू कागे, महंतेश कौजलगी, महेशतमनावर, बाबासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी, नागराज यादव, केएलईचे मुख्यस्त डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *