नंदगड मार्केटिंगवर मा. आ. अरविंद पाटील यांचेच ‘राज्य’..


एकूण 13 जागांपैकी 10 जागांची पाटील यांच्या बाजूने बिनविरोध निवड; उर्वरीत 3 जागांसाठी रविवारी होणार निवडणूक!

नंदगड : लोकहित न्यूज ..

     संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नंदगड (ता. खानापूर) मार्केटिंग सोसायटीवर पुन्हा एकदा माजी आमदार तथा विद्यमान अध्यक्ष अरविंद पाटील यांनी सत्ता काबीज केली असून, एकूण 13 जागांपैकी 10 जागांवर अरविंद पाटील यांचा पॅनल बिनविरोध निवडून आला आहे. तर आणखी तीन जागांसाठी रविवारी निवडणूक होणार आहे.

 

निवडून आलेले संचालक असे…

    कृषी पतीन संघ ‘अ’ गटातून मा.आ.अरविंद पाटील, बैलूर कृषी पतीन संघाचे अध्यक्ष दामोदर नाकाडी, प्रकाश गावडे(सांगरगाळी- गुंजी ), चांगप्पा बाचोळकर (ईदलहोंड), उदय मनोहर सावंत (चापगाव), जोतिबा विवेकानंद भरपन्नावर (आवरोळी), श्रीशैल राजपा बाटोळी (लिंगणमठ) यांची निवड. तर अ वर्ग अनुसूचित जाती मधून रफिक हलशीकर यांची तर महिला ब गटातून तेजस्विनी चंद्रशेखर होसमनी (खानापूर) , पार्वती विठ्ठल पाटील( कसबा- नंदगड), यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तीन जागांसाठी रविवारी चुरस असेल…

      उर्वरीत तीन मागासवर्गीय ब गटासाठी सत्ताधारी पॅनलकडून महारुद्रप्प हिरेमठ ( इटगी), जितेंद्र टो. मादार (नंदगड),  निंगप्पा करेप्पा तलवार (इंदूर), तर विरोधी गटाकडून रुक्मांना झुंजवाडकर (खैरवाड), देवापा ह. मादार (हलशी), निंगप्पा दु. नाईक (खानापूर) असे उमेदवार आखाड्यात आहेत..

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *