विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे  ‘नारी शक्ती’  विधेयक नामंजूर!


घटना दुरुस्तीसाठी दोन तृतांश पाठिंबा मिळू शकला नाही; मोदी सरकारवर पहिल्यांदाच नामुष्कीची वेळ...

नवी दिल्ली: लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)

       लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना 33 आरक्षण देणारे मोदी सरकारचे नारी शक्ती विधेयक अखेर विरोधकांच्या एकजुटीमुळे नामंजूर करण्यात आले. त्यासाठी लागणारे एक तृतांश मतदान होऊ शकले नाही, यासाठी 352 मतांची गरज असतांना एनडीएच्या बाजूने 298 मते मिळाली. त्यामुळे मोदी सरकारच्या काळातील हे पहिलेच विधेयक विरोधकांच्या एकजुटीमुळे फेटाळून लावल्याने केंद्र सरकारवर नामुष्कीची वेळ आली. यावेळी बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्हीं नारी शक्तीचा अपमान करत आहात, याची तुम्हांला किंमत मोजावी लागेल, असा सज्जड इशारा दिला. त्यावर निवडणुकीच्या राजकीय लाभासाठी भाजपची राजकीय खेळी असल्याचा दावा विरोधकांनी प्रत्युत्तररादाखल दिला. अखेरपर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला पण, तो विरोधकांच्या ठामपणामुळे असफल ठरला!

यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी विशेष अधिवेशन पार पडले!

     महिलांना 33 टक्के आरक्षण अर्थात केंद्र सरकारच्या प्रतिष्ठेचे नारीशक्ती या विधेयकावर चर्चा करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते, त्यात 20 तासांहून अधिक काळ चर्चा करण्यात आली. मात्र, विरोधकांच्या एकजुटीमुळे तसेच पाठिंब्यासाठी लागणारी 352 ऐवजी 298 इतकीच मते मिळाल्याने ते विधेयक नामंजूर करण्यात आले.

तिन्हीही विधेयके नामंजूर; रालोआची संसद भवनात निदर्शने!

     महिलांना 33 आरक्षणाशी मतदारसंघाची फेररचना घटना दुरुस्ती, मतदारसंघाची फेररचना व केंद्रशासित प्रदेशात कायदा लागू करणारे विधेयक अशी तीन विधेयके केंद्र सरकारने मांडली होती, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षांत फूट पडण्याच्या प्रयत्नही झाला. पण तोही विरोधकांच्या एकजुटीमुळे असफल ठरला! त्यामुळे संतप्त झालेल्या सताधाऱ्यांनी संसदेच विरोधकांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली होती.

महिलांच्या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागेल: केंद्रीय गृहमंत्री अमित .. तुम्हीं ही विधेयके नाकारून देशाची नुकसान करत आहात, या विधेयकांमुळे दक्षिणेकडील जागांवर कोणताच परिणाम होणार नसून, उलट लोकसंख्येनुसार प्रतिनिधी मिळणे गरजेचे आहे, त्यामुळेच आम्हीं ही तीन विधेयके आणली होती. शिवाय महिलांना पूर्णपणे समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आणण्याची आमचा योजना होती, तुम्हीं ती नाकारून संपूर्ण देशातील नारी शक्तींचा अपमान केला आहे, त्याची तुम्हांला किंमत मोजावी लागेल असा सज्जड इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना दिला..

तुम्हीं ही विधेयके नाकारून देशाची नुकसान करत आहात, या विधेयकांमुळे दक्षिणेकडील जागांवर कोणताच परिणाम होणार नसून, उलट लोकसंख्येनुसार प्रतिनिधी मिळणे गरजेचे आहे, त्यामुळेच आम्हीं ही तीन विधेयके आणली होती. शिवाय महिलांना पूर्णपणे समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आणण्याची आमचा योजना होती, तुम्हीं ती नाकारून संपूर्ण देशातील नारी शक्तींचा अपमान केला आहे, त्याची तुम्हांला किंमत मोजावी लागेल असा सज्जड इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना दिला..

महिला आरक्षणाच्या आडून भाजपची राजकीय खेळी: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा टोला!

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर, बालाकोट आणि नोटाबंदीचे जादुगार  असा टोला लगावला. यावर  सत्ताधाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती, संसदीय कामकाजमंत्री किरण रिजिजू यांनी राहुल गांधींवर देशाच्या लष्कराच्या सशस्त्र मोहिमांचा अपमान केल्याचा आरोप केला. पुढे बोलतांना राहुल गांधी म्हणाले, महिला आरक्षणाआडून भाजप राजकीय खेळी खेळत आहे, यामध्ये महिलांचा मुद्दा कुठेही त्यांच्या केंद्रस्थानी नाही असाही टोला त्यांनी लगावला. यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गोंधळ उडाला.

कोण काय म्हणाले…

     आज नारी शक्तीच्या पाठीमागे उभे राहण्याची संधी विरोधकांना चालून आली होती, ती त्यांनी गमावली आहे.

     – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र.

काँग्रेस आणि विरोधी पक्षांना महिलांना पुढे येऊ द्यायचे नाही, सामान्य अती मागास महिलांना पुढे आणण्याचा केंद्र सरकारचा चांगला मानस होता. पण, तो विरोधकांच्या मीपणामुळे पूर्ण होऊ शकला नाही. शिवसेनेच्यावतीने आम्ही विरोधकांचा तीव्र शब्दात निषेध करतो.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र.

मोदी आणि शहा यांनी देशाचे संविधान आणि संघराजीव रचनेला हानी पोहचवण्याचा डाव रचला होता, तो आमच्या एकजुटीमुळे हाणून पाडला आहे, सर्व विरोधी पक्षांचे आभार..

   –मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस.

महिलांचा मुद्दा आणि फेररचनेचा मुद्दा भाजपकडून आपल्या स्वार्थी राजकारणासाठी रेटला जात होता. त्या त्यांच्या कृत्याचे पितळ देशासमोर उघडे पडले आहे, मी महिलाच असून, नारीशक्तीचा आम्हालाही अभिमान आहे.

   –ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री पश्चिम बंगाल..

हा तर लोकशाहीचा विजय आहे, तमिळनाडू आणि दक्षिण राज्ये दिल्ली विरुद्ध लढले अन् जिंकलेही..

   – एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री तमिळनाडू..

मोदी यांची उलटगणती सुरू झाली असून, महिला आणि फेररचना विधेयक नामंजूर झाले आहे,  

   –अरविंद केजरीवाल, माजी मुख्यमंत्री दिल्ली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *