
भाजपचे नूतन मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचा प्रवास थक्क करणारा!
कोलकत्ता: लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालम मधील राजकारणाला अखेर विराम लागला असून, कधी काळी काँग्रेसचे नगरसेवक तर तृणमूल काँग्रेसचे नेते म्हणून प्रकाशझोतात असणाऱ्या सुवेंदु अधिकारी यांच्या गळ्यात भाजपने मुख्यमंत्री पदाची माळ टाकली आहे. एकेकाळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपने अधिकारी यांना विरोधी गटात असतांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही आणि आज त्यांच्याच हातात भाजपने सत्ता दिली. याची देशभर चर्चा सुरू असून, विरोधी पक्षातील असोत किंवा स्वपक्षातील भ्रष्टाचार आणि विविध प्रकारचे आरोप असणाऱ्यांनाच भाजप श्रेष्टींकडून अधिक पसंती मिळतांना दिसत आहे, त्यामुळे याचीच चर्चा सर्वत्र होतांना दिसत आहे. अधिकारी यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कायमच चर्चेत राहिला आहे.
ममतांना दोनदा पराभूत करण्यास अधिकारी यशस्वी; म्हणूनच मुख्यमंत्री पद पडले पदरात…
ज्यांना भाजपने बंगालचा मुख्यमंत्री केला त्याच सुवेंदु अधिकारी यांना तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये असतांना जेरीस आणले होते, अधिकारी यांना काँग्रेसकडून नगरसेवक असतांना भाजपकडून त्यांच्यावर अनेकप्रकारचे आरोप करण्यात आले होते, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओसहीत आपल्या भाषणामध्ये सुवेंदु अधिकारी कसे पैसे (लांच) घेतात, याची नक्कलही मोदी यांनी करून दाखवली होती. पण, अलीकडच्या काळात अधिकारी यांनी भाजपकडून ममता बॅनर्जी यांना पुरे पुरे करून सोडले आहे, राज्यात चाललेला भ्रष्टाचार, अन्याय, अपुऱ्या सरकारी सुविधा मिळण्यासाठी रस्त्यावरील आंदोलने, निवेदन, मोर्चांचा बडीमार केला आहे, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दोनदा पराभूत करण्याची किमया अधिकारी यांनी करून दाखवली आहे, आणि म्हणूनच भाजप पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवत मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात टाकली.
मोदींची गॅरंटीच्या पूर्ततेची बंगाल वासियांना अपेक्षा!
प्रचारावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्यावर टीकेचा आसूड ओढला आहे. बलात्कारांच्या फायली उघड करणार, महिलांना विशेष सुरक्षा आणि योजनांची गॅरंटी त्यांनी दिली आहे, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यावर असेल, त्याची आठवण करून देण्यासाठी विरोधी बाकावर ममता बॅनर्जी गट असेल. त्यामुळे नूतन मुख्यमंत्र्यांसमोर मोठे आव्हान असेल.






Leave a Reply