आमदार हलगेकरांची आदर्शवत ‘तीन’ वर्षे पूर्ण!


आमदारांचे स्वीयसहाय्यक सुमित नाईक यांच्यासह तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर, विशेष प्रतिनिधी)

     महाराष्ट्रासह बहुतेक राज्ये आणि खानापूर तालुक्याच्या आतापर्यंतच्या इतिहासात आमदारकीची सत्ता भोगलेल्यांची प्रतिमा, त्यांच्या कामाची पद्धत आणि जनतेशी असलेला संपर्क चर्चेत राहिला आहे. त्याला आमदार विठ्ठल हलगेकर यांनी अपवाद अर्थात वेगळे ठरले आहेत.  त्यांचा संयमी स्वभाव, विरोधकांनी आपलेसे करण्याची चाणक्य बुद्धिमत्ता, राज्यात विरोधी ( काँग्रेस) सरकार असतांनाही संबंधित खात्याच्या मंत्री, अधिकाऱ्यांशी चांगले सबंध ठेवून तालुक्यात विकास साधण्याची कार्यपद्धतही वेगळीच राहिली आहे. त्यामुळेच त्यांची आज आमदारकीची आदर्शवत तीन वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त त्यांचे स्वीय सहाय्यक सुमित नाईक यांच्यासह तालुक्यातून आमदार हलगेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लोकहित न्यूज तर्फे आमदारांचे खूप खूप अभिनंदन!

       राज्य सरकारच्या पंचहमी योजनांमुळे राज्यातील विकासाची गती कमी झाली असली तरी, त्यातच मार्ग काढत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तालुक्यात बऱ्यापैकी विकास साधल्याच्या प्रतिक्रिया तालुक्यातून व्यक्त केल्या जात आहेत.

गावच्या अन् वैयक्तिक भानगडी, वाद विवादात कधीही हस्तक्षेप नाही...

    आमदार हलगेकरांचे आणखी एक वेगळेपण सांगायचे झाल्यास त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक, गावच्या वाद विवादात कधीही हस्तक्षेप केला नाही, पोलिस स्थानकातील एखादे प्रकरण त्यांच्यापर्यंत गेले तर ते प्रकरण शांततेने दोन्हीं बाजू समाधानाने कसे मिटेल. याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. त्यामुळेच ते विरोधकांनाही आपलेसे वाटतात. त्यामुळेच त्यांना लोकप्रिय आमदार आणि सर म्हणून तालुक्यात ओळखले जाते.

दानशूर व्यक्तिमत्व ते तालुका ‘कुटुंब’ प्रमुख!…

    समाजातील गोर गरीब गरजू नागरिकांना मदत करण्यास ते नेहमीच पुढे असतात. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची मोठी मदत लाभली आहे. सोसायटी, शाळा आणि महालक्ष्मी ग्रुप संचलीत लैला शुगर्स फॅक्टरीच्या माध्यमातून उत्तम समाजकार्य करत ते तालुक्याचे आदर्श ,आमदार‘ म्हणून तालुका कुटुंब प्रमुख पदी विराजमान झाले आहेत. आज आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या सोसायटी, महालक्ष्मी ग्रुप संचलीत लैला शुगर्स, शांतिनिकेत स्कूलच्या माध्यमातून हजारो कुटुंबांचा संसार चालतो. त्यामुळेच ते अनेकांचे आधारस्तंभ बनले आहेत, त्यामुळेच त्यांना आजही सर म्हणूनच जनतेत ओळख आहे..

प्रतिक्रिया

    सर हे सरच आहेत, त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व होणे नाही. त्यामुळेच ते आमदार म्हणूनही जनतेत लोकप्रिय ठरले आहेत. त्यांच्या आदर्शवत कामगिरीची तीन वर्षे कधी? निघून गेली, याचा पत्ताही लागला नाही! या तीन वर्षात त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीला आमचा ‘मानाचा मुजरा’!

    –सुमित नाईक, आमदारांचे स्वीयसहाय्यक…

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *