आमटे येथील लक्ष्मण कसर्लेकर यांचे मोठे बंधू  रामा कसर्लेकर यांचे निधन…


हृदय विकाराच्या झटक्याने आज पहाटे निधन झाले…

  

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )

     आमटे (ता. खानापूर) येथील प्रतिष्ठित पंच, उत्तम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध असणारे रामा खेमा कसर्लेकर ( वय.65) यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, दोन भाऊ , नातवंडे असा परिवार आहे. श्री स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी) तीर्थक्षेत्र कमिटीचे अध्यक्ष, आमटे कृषी पत्तीन संघाचे अध्यक्ष, श्री वनदेवी सोसायटीचे संस्थापक -अध्यक्ष तसेच माजी आमटे ग्राम पंचायत अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांचे ते मोठे भाऊ होत. आज दुपारी अडीच वाजता आमटे येथे त्यांच्या देहावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *