कक्केरी परिसरात वळीव पावसाचा दणका; शाळा,घरे,35  विद्युत खांबांचे नुकसान!


कालपासून कक्केरी, अळनावर लगतच्या परिसरात विद्युत पुरवठा खंडित…

 

    गेल्या आठवड्यापासून गरमीने उच्चांक गाठला असून, वळीव पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. काल ( मंगळवार) सायंकाळी 6 च्या दरम्यान कक्केरी अळनावर, गोधोळी, लिंगनमठ, भूरनकी, केरवड परिसरात वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वादळाने ठिकठिकाणी पडलेल्या झाडांमुळे 35 विद्युत खांबांचे नुकसान झाले असून, कक्केरी येथील अब्दुल करीम लंगोटी यांच्या घरावरील तब्बल एक टन वजनाचे पत्रे वादळाने उडून शंभर मीटर लांब उडून पडले, इतका वादळाचा वेग होता. याच गावातील विनायक राजपूत यांच्या घरावर नारळाचे झाड पडून तर बाळाप्पा मुरगोड, चीरतय्या हिरेमठ यांच्या घरावरील कौले वाऱ्याने उडवून नुकसान झाली आहे. तसेच रामापूर येथील उर्दू शाळेचेही पत्रे उडून मोठी हाणी झाली आहे. काहीं रस्त्यांवर झाडे पडल्याने बससेवा खोळंबली होती, अशी माहिती रयत संघटनेचे नेते किशोर मिठारी यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

देवराई, जांबेगाळी परिसरातही वादळी पावसाने अनेक घरांची पडझड; मा. आ. अरविंद पाटील यांची भेट…

     तालुक्यातील देवराई, जांबेगाळी परिसरात वादळी पावसाने अनेक घरांची पडझड झाली. येथील कौशल्य कोलकार, शबनम इनामदार, ज्ञानेश्वर सुतार, सुब्राव इनामदार, सय्यद मुल्ला यांच्या घरांची तर येथील मराठी शाळेचीही नुकसान झाली आहे. याची माहिती मिळताच माजी आमदार तथा डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील त्यांचे सहकारी रफीक हलसिकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. लागलीच मा.आ. अरविंद पाटील यांनी स्थानिक वनाधिकारी, पीडीओंशी संपर्क साधून तत्काळ नुकसानग्रस्त भागाची चौकशी, पंचनामे करण्याची सूचना केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *