वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भूरनकीतील , कक्केरी भागाची आमदारांकडून पाहणी..
बिडी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर )
कक्केरी, भुरणकी, जांबेगाळी, देवराज परिसरात वादळी पावसाच्या तडाख्याने मोठी नुकसान झाली आहे. घरांसह शाळेचे नुकसान झाले असून, 35 हून अधिक विद्युतखांब जमीनदोस्त झाले आहेत तर अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून पडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून, तात्काळ सबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली. शिवाय याबाबत खबरदारी घ्या असाही इशारा आमदार हलगेकर यांनी यावेळी दिला.

फोटो: भुरणकी येथील नुकसान झालेल्या कन्नड शाळेची पाहणी करतांना आमदार विठ्ठल हलगेकर व गावचे नागरिक..
कामचुकारपणा करणाऱ्यांची गय नाही….
खानापूर तालुका हा जास्त पाऊस पडणारा तालुका असल्याने दरवर्षी पावसामुळे मोठी हाणी होत असते, याची सर्वच अधिकाऱ्यांना चांगलीच कल्पना आहे, तरीही कोणी कामचुकारपणा करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे अशी तंबी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. कोठे कोठे दरवर्षी समस्या जाणवतात त्या भागांची आधीच खबरदारी घ्या अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.






Leave a Reply