इरफान ताळीकोटींनी ‘दिला’ देवराई, जांबेगाळीतील नुकसानग्रस्तांना ‘आधार’


अती नुकसान झालेल्या 6 घरांना तालुका अंजुमन इस्लामचे अध्यक्ष व माजी तालुका युथ काँग्रेस अध्यक्ष इरफान ताळीकोटी यांच्याकडून दहा हजारांची मदत!

    

खानापूर/ देवराई:  लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     

     मंगळवारी कक्केरी, भुरणकी, जांबेगाळी देवराई भागात वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, अनेक घरांची पडझड झालेली आहे. देवराई,जांबेगाळीत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, 6 घरांचे मोठे नुकसान झाले आहे, या नुकसानीचा तहसीलदार आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामे करण्यात येत आहेत, पण सरकारी भरपाई कधी येईल याची शाश्वती नाही. त्याआधी सामाजिक कार्यकर्ते इरफान ताळीकोटी यांनी मदतीचा हात पुढे केला असून, अती नुकसान झालेल्या 6 घरांच्या नुकसानग्रस्त नागरिकांना 10 हजारांची मदत दिली आहे. त्यामुळे तुर्तास नुकसानग्रस्तांना दिलासा मिळाला असून, लवकरात लवकर सरकारी भरपाई मिळवून देण्यासाठीही मी प्रयत्नशील असेन असा धीर ताळीकोटींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतांना नागरिकांना दिला आहे.

     

इरफान ताळीकोटी यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना दिली नुकसानीची माहिती…

       इरफान ताळीकोटी यांनी  नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. लागलीच त्यांनी तत्काळ नुकसानग्रस्त घरांचे फोटो जिल्हाधिकारी महमद रोशन यांना पाठवताच , तहसीलदारांना तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना इरफान ताळीकोटी यांच्याशी संपर्क साधून, सोबत पाहणी करू असा विश्वास देत बुधवारी पाहणी दौरा केला. त्याचवेळी इरफान ताळीकोटी यांनी तहसीलदार , रेंजर यांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई मिळवून द्या अशी मागणी केली. आणि स्वतः अती नुकसान झालेल्या 6 घरांना दहा हजाराची मदत मी माझ्याकडून देतो असे भेटीवेळी तालुका अंजुमन इस्लामचे अध्यक्ष व माजी तालुका युथ काँग्रेस अध्यक्ष इरफान ताळीकोटी यांनी जाहीर केले. अशा उत्तम सामाजिक कार्याबद्दल त्यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

जांबोटी भागातही इरफान ताळीकोटी यांच्याकडून वैयक्तिक व शासकीय मदत…

     सामाजिक कार्यकर्ता आणि गरीबांचा कैवारी म्हणून तालुक्यात सध्या एकच नाव गाजत आहे, ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते  इरफान ताळीकोटी ! तालुक्यात धार्मिक, सामाजिक, नागरी समस्यांसाठी त्यांनी जणू चंगच बांधला आहे. जांबोटी भागातील बैलूर लक्ष्मी यात्रेसाठी देवीच्या जागेवर फेवर्स टाकण्यासाठी लाखोंचा निधी मंजूर करून दिला. नंदगड, इटगी, गुंजीसह तालुक्यातील प्रत्येक भागात इरफान ताळीकोटी अनेक शासकीय कामे मंजूर करून आणली असून, वैयक्तिक मदतही केली आहे. यावेळी सर्कल जग्गू पक्काली, रेंजर सचिन होसमनी, घोटगाळी पंचायत पिडीओ उत्तम बनसोडे आदी उपस्थित होते.

यांना मिळाली इरफान ताळीकोटी यांच्याकडून मदत…

     कौसल्या कृष्णा कोलकार( देवराई), झाकीर हुसेन इनामदार (देवराई), सोग्रा नूरजहान ईमानदार (देवराई), बसवानी जी. तिरमिळकर (देवराई), इस्लाम एम. मुल्ला (जांबेगळी), रजिया एम. पाटील ( जांबेगळी) ….!

प्रतिक्रिया

     मी तालुक्याचा भूमिपुत्र असून, मला माझ्या तालुक्याचा सार्थ अभिमान आहे, त्यासाठी माझ्याकडून जी मदत लागेल ती मी करण्यासाठी सदैव तत्पर असेन. मग ती मदत सार्वजनिक असो किंवा वैयक्तिक! यासाठी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन करतो!

    –इरफान ताळीकोटी, तालुका अंजुमन इस्लाम अध्यक्ष, माजी युवा काँग्रेस नेते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *