कागदपत्रांचा पुरवठा करा; समस्या सोडवू: इरफान ताळीकोटी!


आमटेत पांडुरंग सप्ताहाला भेट दिल्यानंतर नागरिकांना ग्वाही!

  

आमटे: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

         कोणत्याही शासकीय कामांसाठी कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याशिवाय आपण सरकारला कामे अन् समस्याही दाखवू शकत नाही. आपल्या गावातील समस्यांची कागदपत्रे मला द्या, मी ती सरकारदरबारी देऊन कामे मंजूर करून आणतो, अशी ग्वाही तालुका अंजुमन इस्लामचे अध्यक्ष व माजी तालुका युथ काँग्रेसचे अध्यक्ष इरफान ताळीकोटी यांनी दिली. आज (14) आमटेत ( ता. खानापूर) पांडुरंग सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी युवा नेते सुरेश केरकर, माजी तालुका पंचायत सदस्य चिदंबर गावकर, माजी ग्राम पंचायत सदस्य प्रकाश गुरव, पोस्टमन रामा गावकर,विलास गावकर व सर्व गावकरी उपस्थित होते. पुढे बोलतांना, श्री.ताळीकोटी म्हणाले की, कागदपत्रे द्या, शिवाय वेळेप्रसंगी सबंधित खात्याचे मंत्री,अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनीही भेटावे लागेल, त्यावेळी माझ्याबरोबर तुम्हीं यावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी गावात आयोजित केलेल्या श्री पांडुरंग सप्ताह सोहळ्यानिमित श्री पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर श्री.ताळीकोटी बोलत होते.

बैलूरमध्ये लक्ष्मी गदगेच्या जागेवर 10 लाखांचे फेवरर्स चे काम पूर्ण…

     आजच समाप्त होत असलेल्या बैलूर लक्ष्मी यात्रेसाठी 10 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातून श्री लक्ष्मी गदगेवर बसण्याच्या ठिकाणी फेव्हर्सचे काम झाले आहे. शिवाय तालुक्यात अनेक ठिकाणी सरकारकडे पाठपुरावा करत अनेक कामे मंजूर करून आणली आहेत, त्यासाठी गावकऱ्यांचेही सहकार्य तितकेच महत्वाचे आहे. बैलूरच्या कामासाठी तेथील देवस्थान कमिटी व गावकरी माझ्यासोबत पालकमंत्री सतीश जार्कीहोळी यांच्याकडे आले होते, तसेच इतरही समस्याग्रस्त गावकऱ्यांनी आमच्या पाठीशी रहावे असेही इरफान ताळीकोटी यांनी केलेल्या कामांचा उल्लेख करतांना माहिती दिली.

आमटेकरांनी काय समस्या मांडल्या…

        कालमनी ते आमटे, आमटे ते बसवण्णा, आमटे ते गोल्याळी या तीन रस्त्यांसह गावातील छोट्या मोठ्या संस्यांसाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी गावकऱ्यांनी यावेळी केली. त्यावर बोलतांना, तुम्हीं गावकऱ्यांनी त्यासाठी लागणारी कागदपत्रे मला द्यावीत, मी सरकार दरबारी प्रयत्न करतो, असे उत्तर देतांना तालुका अंजुमन इस्लामचे अध्यक्ष व माजी तालुका युथ काँग्रेसचे अध्यक्ष इरफान ताळीकोटी यांनी दिले.

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *