‘दिव्यांग, निराधारांसाठी ‘धावले’ प्रसाद पाटलांचे ‘शिष्टमंडळ’!


21 हजार दिव्यांग, विधवा, वृद्धांच्या पेन्शन थांबल्या; अनेकांवर पोटापाण्याचा प्रश्न, तहसीलदारांना निवेदन सादर…

  

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      सर्वेक्षणाच्या नावाखाली तालुक्यातील 21 हजार दिव्यांग, विधवा, वृद्धांची पेन्शन बंद झाली असून, लाभार्थींवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी सर्वेक्षणाच्या नावाखाली खऱ्या लाभार्थींवर अन्याय होत असून, योग्य ते काम होईना, त्यामुळे बहुतेक दिव्यांग विधवा वृद्धांच्या पेन्शन थांबल्यामुळे अन्याय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तुम्हीं अशा निराधार व्यक्तींना सरकारने मदत करण्याची अत्यंत गरज आहे. त्यादृष्टीने आपण विचार करावा या मागणीचे निवेदन गर्लगुंजीचे धडाडीचे नेते ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शिष्टमंडळाने  आज तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना सादर केले.

      सदर निवेदनात, तालुक्यातील 21 हजार दिव्यांग, विधवा, वृद्धांची पेन्शन सर्वेक्षणाच्या नावाखाली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थींच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे सरकारने तत्काळ योग्य तो सर्वे पूर्ण करून बंद असलेल्या पेन्शन सुरू कराव्यात. यासाठी तलाठी आणि सर्वे करणाऱ्यांना लवकरात लवकर योग्य ते सर्वेक्षण पूर्ण करण्याची सूचना द्या, जेणेकरून निराधार नागरिकांना दिलासा मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी लवकरात ही समस्या निकालात काढण्यात येईल अशी हमी दिली. यावेळी प्रमोद सुतार, पराशराम बेळगावकर, रामचंद्र लोहार, माऱ्याप्पा पाटील आदी उपस्थित होते.

हेस्कॉमची दुरुस्ती ठरते नागरिकांची डोकेदुखी; त्याही समस्येचा पाठपुरावा करा…

          दरवर्षी ऐन पावसाच्या तोंडावर हेस्कॉम खाते दुरुस्तीचे काम हाती घेते, परिणामी त्या कारणास्तव अनेक दिवस नागरिकांना काळोखात रहावे लागते, याचा शाळेच्या विद्यार्थ्यांसह व्यावसायिकांना फटका बसत आहे. त्याचाही पाठपुरावा करून हेस्कॉमला कारभार सुधारण्याचा आदेश द्या अशीही मागणी यावेळी करण्यात आली..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *