(सूचना : वाळू वाहतुकीच्या टिपर ट्रकचा संग्रहित फोटो वापरला आहे)…
सीपीआय गवंडी यांचा आशिर्वाद?? ; जांबोटी पोलिस झोपेत आहेत का?? कधी करणार कारवाई???
जांबोटी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जिल्हा पोलिस प्रमुखांचे नाव पुढे करून खानापूर तालुक्यातील वाळू वाहतूक पूर्णपणे बंद केल्याने अनेक कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला असतांना, निवडणुकीत व्हाईट कपडे घालून मिरवणारे तालुक्यातील पुढारी डोळे मिटून गप्प बसले आहेत, त्यात भर पडली आहे, पोलिसांच्या दादागिरीची! तालुका पोलिस नाना तऱ्हेने सामन्यांवर अन्याय करत आहेत. अशावेळी गोरगरीब नागरिकांनी जायचे कुठे? अशावेळी सत्ताधारी – विरोधक एकमेकाकडे बोट दाखवत वेळ मारून नेत आहेत. याच तालुक्यातील जांबोटी पश्चिम भागात, बेळगांव तालुक्यातील देसुरी वाळू दिवसाढवळ्या जोरात सुरू आहे, त्या वाहतुकीला परवानगी पास आहे की, नाही याची तपासणी पोलिसांनी करण्याची गरज असताना पोलिसांकडून असे काहीच होतांना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांचे काम काय? !.
दिवसाढवळ्या चोर्ला घाटातून गोव्याला देसुरी वाळूची लिफ्ट!
बेळगांव तालुक्यातील देसुर येथून जांबोटीमार्गे दिवसाढवळ्या गोव्याला वाळूची वाहतूक जोरात सुरू आहे, या वाहतुकीला पास असण्याची शक्यता कमी आहे, एकीकडे जिल्हा पोलिस प्रमुखांचे नाव पुढे खानापूर तालुक्यातील वाळू बंद केल्याने स्थानिक वाहतूकदार अडचणीत आले आहेत, असे असतांना बाहेरची वाळू कशी चालते?? त्याला पोलसप्रमुखांची परवानगी आहे का? खानापूर सीपीआय गवंडी आणि त्यांचे जांबोटीचे पोलिस काय करत आहेत, देसुरी वाहतुकीची जांबोटी पोलिस तपासणी करतांना दिसत नाहीत . त्यावरून संशयाची सुई पोलिसांवर येते, हप्त्यावर ही वाहतूक सुरू आहे का? असा सवाल स्थानिक नागरिकांतून केला जात आहे.
प्रतिक्रिया
एमसँड सोडून अशी कोणतीच वाळू वाहतूक होते अशी आमच्याकडे माहिती नाही, तशी कोणती वाहतूक सुरू असेल तर जरूर कळवावे, तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसा आदेश जांबोटी पोलिसांना देण्यात येईल.
डॉ. विरेय्या हिरेमठ, डीएसपी खानापूर.






Leave a Reply