मंदिराचा वर्धापन दिन; काल (21, रोजी) नवग्रह, नऊ मुखी कालसर्प , काळभैरव आणि कालिका माता मूर्ती पूजन पार पडले, आज भजन किर्तन, आरोग्य शिबिराचे आयोजन…
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रसिद्ध स्थळ म्हणून ओळख असणाऱ्या जांबोटी (ता. खानापूर) श्री मंजुनाथ दुर्गा देवी ( ट्रस्ट) मंदिरात मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आज तिन्हीं राज्यांतून मोठी गर्दी उसळणार आहे. काल मंगळवार (दि.21 ) आणि आज बुधवार (दि.22 ) रोजी दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, मूर्ती पूजा, भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. काल येथील नवग्रह, नऊ मुखी कालसर्प, काळभैरव व कालिका माता मूर्ती पूजनाचा कार्यक्रम पार पडला.
आज शेकडो भाविकांची गर्दी होणार; 9 ते 12 प्रवचन, कीर्तन….
श्री मंजुनाथ दुर्गा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या दुसऱ्या दिवशी भागातील आणि गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा तिन्हीं राज्यांतून शेकडो भाविकांची मोठी गर्दी आज होणार असून, यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 ते 12 यावेळेत जांबोटी बसस्थानक ते श्री मंजुनाथ दुर्गा मंदिरापर्यंत राष्ट्रीय वारकरी संप्रदाय कर्नाटक राज्याचे अध्यक्ष परशुराम भ. कनगुटकर यांच्या उपस्थितीत ह. भ. प निवृत्ती महाराजांचे प्रवचन, किर्तन होणार आहे. तसेच बेळगांव, खानापूर आणि चंदगड तालुक्यातील विविध गावच्या मंडळांची भजने सादर होणार आहेत…
मंजुनाथ दुर्गा देवी ट्रस्टचा धार्मिकतेसह सामाजिक सलोखा; आज आरोग्य तपासणी शिबिर…
मंजुनाथ दुर्गा देवी ट्रस्टने धार्मिक वारसा वाढवण्याबरोबर सामाजिक सलोखाही राखला आहे, दरवर्षी होणाऱ्या श्री दत्त उत्सवासह वर्षभरात साजऱ्या होणाऱ्या येथील धार्मिक कार्यक्रमात आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. आज (दि.22) रोजी विविध आजारांवरील विशेष तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी शिबिर होणार असून, भागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मंजुनाथ दुर्गा देवी ट्रस्टच्यावतीने करण्यात येत आहे. यावेळी गडहिंग्लज एसजीएम कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. संजय चव्हाण, डॉ. विजय सुत्तार, डॉ. अर्जुन शिंदे, हृदयरोग तज्ञ डॉ.स्नेहा कारेकर (बंगळूर ), डॉ. विनोद हण्याकर, डॉ. कराडे सांगोला, डॉ. नागराज रामराव जाधव या विशेष डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात सहभागी होणार आहे…






Leave a Reply