डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर


खानापुरात विविध ठिकाणी महामानवाला अभिवादन; आजी -माजी मान्यवरांची उपस्थिती!

      

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

            सर्वसमावेशक देशाची लोकशाही बनवत सर्वसामान्यांना समान कायदा, हक्क आणि मुख्य म्हणजे मुक्त वावरण्यास ज्यांच्या भक्कम भारतीय संविधानाने मार्ग दिला, त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन! बाबासाहेबांच्या उत्तम कार्यामुळे आज आपण याठिकाणी जमलो आहोत, त्यांचे कार्य जगातच महान आहे, जगामध्ये सर्वात बलवान लोकशाही म्हणून भारताच्या लोकशाहीची ओळख आहे, त्याचे निर्माते आहे बाबासाहेब! त्यामुळे त्यांनी घालून दिलेले नियम आणि मूल्यांचे आम्हीं पालन करणे गरजेचे आहे, असे मत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मांडले. तालुक्यात आज सर्वत्र मोठ्या उत्साहात महामानवाला मानवंदना देण्यात आली, याचप्रमाणे तालुका प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित ते बोलत होते.

        यावेळी तहसीलदार दुंडाप्पा कोमार, माजी आमदार अरविंद पाटील, तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी, राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, काँग्रेस नेते सुरेश जाधव, माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, तालुका भाजप सचिव मल्लापा मारिहाळ व गुंडू तोपीनकट्टी, पंचहमी योजना तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, दीपक कवठणकर , गुडू टेकडी यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

मान्यवरांची भाषणे; जोरदार घोषणाबाजी…

        यावेळी माजी आ. अरविंद पाटील, तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी, तहसीलदार दुंडाप्पा कोमार, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, सुरेश जाधव यांची भाषणे झाली. यावेळी बाबासाहेबांचा विजय असो, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

     


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *